'भूलभुलैया ३' चित्रपटात 'मंजुलिका' ची भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनच्या कमी झालेल्या वजनाची चर्चा होत आहे. मध्यंतरीच्या काळात विद्या बालनचे वजन वाढले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचासुद्धा सामना करावा लागला होता. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैया ३' मध्ये विद्याचा एकदम बारीक झालेली दिसते. विद्या बालनच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांनाचं अगदी चकीत केल्याचे दिसत आहे. विद्याने वजन कमी करण्यासाठी खास 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो केल्याचे समोर येत आहे. सध्या हे 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. फक्त विद्याच नाही तर बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री हे डाएट फॉलो करत आहेत. विद्या प्रमाणेच समंथाने देखील हे डाएट करुन वजन कमी केले आहे(Vidya Balan Reveals The Secret Behind Drastic Weight Loss).
या डाएट प्रकारामध्ये, आपल्या आहारातील दाहक-विरोधी म्हणजेच नैसर्गिकरित्या जळजळ कमी करणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर दिला जातो. हा आहार अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि ओमेगा - ३ फॅटी ऍसिडस् अशा पदार्थानी समृध्द असतो. विद्याने हे डाएट फॉलो करताना वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यातील एक म्हणजे वजन कमी करण्यासाठीचे 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक'. हे डाएट फॉलो करताना विद्या सकाळी उठल्या उठल्या हे 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' प्यायची. हे 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' म्हणजे नेमकं काय ? त्याचा वजन कमी करण्यासाठी कसा फायदा होतो? ते कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात(vidya balan's anti inflamatory morning drink recipe).
साहित्य :-
१. ग्रीन टी ची पाने - १ टेबलस्पून
२. काळीमिरी - १/२ टेबलस्पून
३. ओली हळद - १/२ टेबलस्पून
४. ऑलिव्ह ऑइल - १ टेबलस्पून
५. गरम पाणी - १ ग्लास
विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...
चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते हलकेच उकळवून घ्यावे.
२. पाणी उकळल्यानंतर त्यात ग्रीन टी ची सुकलेली पाने घालावीत. त्यानंतर खलबत्यात ओली हळद व काळीमिरी घेऊन एकत्रित कुटून त्याची जाडसर भरड करावी. ही भरड या गरम पाण्यात घालावी.
३. आता या पाण्याला एक हलकी उकळी येऊ द्यावी. मग गॅस बंद करुन हे पाणी गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या पाण्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करुन घावे.
वजन कमी करण्यासाठी 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' पिण्यासाठी तयार आहे.
'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' पिण्याचे फायदे...
१. ग्री टी :- ग्री टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे ग्रीन टी प्यायल्याने आपल्या चयापचय क्रियेचा वेग वाढतो, परिणामी वजन कमी करण्यासाठी ग्री टी फायदेशीर ठरते.
२. काळीमिरी :- काळीमिरी आपल्या शरीरातील हायड्रोक्लोरिक अॅसिडचा स्राव वाढवते, जे आपल्या पचनसंस्थेला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असते, यामुळे अन्न व्यवस्थित पचून वजन कमी होण्यास मदत मिळते.
३. ओली हळद :- हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
४. ऑलिव्ह ऑईल :- ऑलिव्ह ऑईल मध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि इतर अनेक पोषक तत्वांसह अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रेरॉल बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.