बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच तिच्या उत्कृष्ट आणि आकर्षक फिगरसाठी ओळखली जाते. अनुष्का शर्मा ही कायम फिट दिसणारी आणि मेन्टेन्टड असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. अनुष्का तिच्या अभिनयाशिवाय ट्रेंडी फॅशन आणि फिटनेससाठी ही ओळखली जाते. स्वतःला नेहमी फिट आणि सक्रीय ठेवण्यासाठी अनुष्का योग्य आहार आणि अर्थातच व्यायाम यांचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळते. इतकेच नव्हे तर, अनुष्का शर्माने आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यातही आपलं वर्कआउट सुरुच ठेवलं होत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतरही तितकीच फिट आणि ब्युटीफुल आहे.
नुकतेच एका ब्रँडला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या निरोगी आरोग्यासाठी कोणता बदल तिने आयुष्यात केला आहे याबाबत सांगितले. तिने सध्या हेल्दी लाईफस्टाईलचे एक रुटीन तयार केले असून इंटरमिटेंट फास्टिंगनुसारच आपली खाण्याची पद्धत आणि रूटीन ठेवले आहे. अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमक काय करते ते समजून घेऊयात(Anushka Sharma Talks on Intermittent Fasting Benefits for Health; Eating before sunset and waking up early have magical effects on health, says Anushka Sharma).
अनुष्का शर्मा फिट राहण्यासाठी नेमकं करते तरी काय?
जेवणाच्या वेळेत करा थोडा बदल...
अनुष्का शर्माने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मी सूर्यास्ताच्या आधीच रात्रीचे जेवण जेवते. साधारणतः संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान माझे जेवण उरकलेले असते आणि याचा माझ्या आरोग्यावर अप्रतिम परिणाम होताना मला दिसतोय. मी अत्यंत काटेकोरपणे आराम करते आणि व्यवस्थित झोप घेते आणि त्यामुळेच माझे झोपेचे सर्व त्रास नाहीसे झाले आहेत. यामुळे सकाळी मी लवकर उठून अधिक उर्जेसह काम करण्यासाठी तयार असते, मी अधिक निरोगी झाले आहे कारण लवकर जेवल्याचा हा परिणाम आहे’.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....
जंक फूड खाण्यावर नियंत्रण...
अनुष्काने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती बाहेरचे खात नाही आणि शूटिंगलादेखील घरचे जेवण घेऊन जाते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खाण्यावर भर द्यावा असंही तिने सांगितलं होतं. फिटनेस फ्रिक राहण्यासाठी जेवणावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
न चुकता ध्यानधारणा करते...
दिवसातून दोन वेळा अनुष्का ध्यानधारणा करण्यावर भर देते. ज्यामुळे ती शांत राहाते आणि नकारात्मक विचाराचा तिच्या मनावर परिणाम होत नाही. मनःशांतीसाठी ध्यानधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असंही तिने सांगितलं.
योगाचा योग्य सराव...
याशिवाय आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगाचा आधार घेतल्याचेही अनुष्काने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. इंटमिटेंट फास्टिंगसह ध्यानधारणा, योगा आणि डान्स या सगळ्याचा अनुष्का आपल्या निरोगी आयुष्यासाठी उपयोग करून घेते. मात्र सूर्यास्ताच्या आधी जेवल्याने अर्थात लवकर जेवल्याचा आपल्याला अधिक फायदा झाल्याचेही ती कबूल करते.
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...
इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड...
सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड अधिक दिसून येतोय. मात्र याचा फायदा अधिक होत असल्याचे अनेक सेलिब्रिटींनी सांगितले आहे. अत्यंत नॉर्मल डाएट असून दिवसभरात ५०० पेक्षा कमी कॅलरी पोटात जायला हवी. संध्याकाळी ७ च्या आधी तुम्ही तुमचं जेवण जे हेल्दी आणि घरचे असेल ते खावे आणि त्यानंतर किमान १२ तासांपासून ते १६ तासांपर्यंत पोटात काहीही जाता कामा नये असा हा ट्रेंड असून यामुळे झटपट वजन कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
रोज किती चमचे साखर खाणं योग्य? साखर खाणं पूर्णच बंद करुन टाकलं तर तब्येत सुधारते, तज्ज्ञ सांगतात...