Join us  

ढेमश्याची भाजी म्हणताच नाक मुरडता? ढेमसे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, ढेमसेही होतील आवडते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 5:06 PM

जगात इतरत्र अपवादानं मिळणारी ढेमसं (apple gourd) भारतात विपुल प्रमाणात मिळतात. ढेमशाची (healthy apple gourd) भाजी चवीनं आणि आनंदानं खाल्ल्यास या भाजीचे (apple gourd benefits to health) आरोग्यास फायदेच अधिक होतील. 

ठळक मुद्देशरीराला भरपूर पोषक घटक आणि फायटोकेमिकल्स मिळतात संशोधन सांगतं की, निरोगी त्वचा आणि केसांसाठी ढेमसे खाणं आवश्यक आहे.हदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर, शरीरात कॅन्सर पेशींची वाढ होण्यास रोखतात.

आज मला ढेमश्याची भाजी खावीशी वाटत आहे असं कोणी अपवादानच म्हणत असावं. नावडत्या भाजीच्या यादीत ढेमश्याच्या भाजीचं नाव असलं तरी ही भाजी अतिशय पौष्टिक आहे. ढेमसे (apple gourd) हे जगभरात भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशातच प्रामुख्यानं मिळतात. जगात इतरत्र ते अपवादानंच मिळतात. जी भाजी आपल्याकडे विपूल आहे, पौष्टिक (healthy apple gourd) आहे ती खरंतर चवीनं आणि आनंदानं खाल्ली तर तिचे आरोग्यास फायदेच (apple gourd benefits to health) अधिक होतील. ढेमश्यात जाडसर बिया या टाकून न देता त्या भाजून खाणं आरोग्यास फायदेशीर असतं असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

ढेमश्याची भाजी पचण्यास सुलभ असते. या भाजीतून शरीराला भरपूर पोषक घटक आणि फायटोकेमिकल्स मिळतात. हे घटक शरीराच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. ढेमश्यांमध्ये कॅरोटेनाॅइड्स नावाचं ॲण्टिऑक्सिडण्टस, सूज आणि दाहविरोधी घटक असतात. ढेमसातील गुणधर्म रक्तदाब नियंत्रित करतात. हदयाच्या आजारांचा धोका कमी करतात. ढेमश्याच्या भाजीतील गुणधर्म शरीरातील कॅन्सरपेशींची वाढ होण्यास रोखतात. भाजीत पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे खाल्ल्यानं लघवीचं प्रमाण वाढून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि किडनीचं आरोग्य चांगलं राहातं. ही भाजी पोटातील आम्लाचं प्रमाण कमी करते. बध्दकोष्ठतेची समस्या कमी होते. संशोधन सांगतं की, निरोगी त्वचा आणि केसांसाठी ढेमसे खाणं आवश्यक आहे अ, क जीवनसत्वं, थियामिन, रायबोफ्लेविन, नियासिन आणि लोह, पोटॅशियम ही खनिजंही असतात. म्हणूनच ढेमश्याची भाजी खाल्ल्याने आरोग्यास विविध फायदे होतात.

Image: Google

ढेमश्याची भाजी का खावी?

1.  श्वासाशी संबंधित विकार असणाऱ्यांसाठी फायदेशीर भाजी आहे. ही भाजी खाल्ल्यानं श्वसन यंत्रणा मजबूत होते.   खाल्ल्याने घशात अडकलेला कफ मोकळा होतो. 

2. त्वचा निरोगी राहाण्यासाठी  भाजी खाणं उपयुक्त आहे. या भाजीतील गुणधर्म  शरीराला बुरशीजन्य संसर्ग, ॲलर्जी होण्यास रोखतात.

Image: Google

3. फायबरमुळे ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डायरिया, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांमध्ये ढेमसाची भाजी खाणं उपयुक्त ठरतं. 

4. ढेमश्याची भाजी नियमित खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.  ही भाजी खाल्ल्यानं वजन कमी होतं. 

Image: Google

5. शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्याची क्षमता. आहार तज्ज्ञांच्या मते ढेमश्याची भाजी खूप मसाले टाकून खाण्यापेक्षा केवळ उकडून खाल्यास जास्त फायदेशीर ठरते. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना