Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तुम्ही इमोशनल इटर आहात का? समीरा रेड्डी सांगतेय, इमोशनल खा-खा टाळण्यासाठी काय करायचे. .

तुम्ही इमोशनल इटर आहात का? समीरा रेड्डी सांगतेय, इमोशनल खा-खा टाळण्यासाठी काय करायचे. .

‘आर यू अँन इमोशनल इटर?’ हा समीराचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल इटिंग हा खरंतर मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे समीरा सारखा प्रश्न आपणही स्वत:ला विचारुन पहायला हवा. समीरा रेड्डी सांगतेय हा इमोशनल इटिंगला ओळखण्याचा आणि त्यावर मात करण्याचा मार्ग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:09 PM2021-08-04T17:09:12+5:302021-08-04T17:18:40+5:30

‘आर यू अँन इमोशनल इटर?’ हा समीराचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल इटिंग हा खरंतर मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे समीरा सारखा प्रश्न आपणही स्वत:ला विचारुन पहायला हवा. समीरा रेड्डी सांगतेय हा इमोशनल इटिंगला ओळखण्याचा आणि त्यावर मात करण्याचा मार्ग.

Are you an emotional eater? Sameera Reddy explains what to do to avoid emotional eating. . | तुम्ही इमोशनल इटर आहात का? समीरा रेड्डी सांगतेय, इमोशनल खा-खा टाळण्यासाठी काय करायचे. .

तुम्ही इमोशनल इटर आहात का? समीरा रेड्डी सांगतेय, इमोशनल खा-खा टाळण्यासाठी काय करायचे. .

Highlightsखरी भूक ही हळूहळू निर्माण होते. ती अचानक भयानक जाणवत नाही.भावनिक भूक अचानक जाणवते. ही भूक अस्वस्थ करते.भावनिक भूक लागते तेव्हा कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही. आणि वजन मात्र वाढतं.छायाचित्रं- गुगल

 आपलं वजन का वाढतं? याचा कधी विचार केलाय का? तो केला जात नाही म्हणूनच वजन वाढण्यावर नेमका उपाय सापडत नाही. पण हा उपाय आपल्याला सापडला नाही म्हणून इतर कोणालाच सापडत नाही असं नाही. असं म्हणतात की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्या स्वत:तच दडलेलं असतं. स्वत:ला थोडं पडताळलं, तपासलं, खणून काढलं की जाणवणार्‍या प्रश्नांची उत्तरंही सापडतात. अभिनेत्री आणि मॉडेल समीरा रेड्डीला हे उत्तर सापडलंय.
हे उत्तर आणि या उत्तराचा प्रवास नुकताच तिनं फेसबुकवर शेअर केला. समीरा सुरुवातीला विचारते की ‘तुम्ही इमोशनल इटर आहात का?’ हा प्रश्न समीरा आता आपल्याला विचारत असली तरी हा प्रश्न तिनं स्वत:ला विचारला काही महिन्यांपूर्वी. आणि जेव्हा तिला त्याचं उत्तर हो आलं तेव्हा या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रवास तिने सुरु केला.

छायाचित्र- गुगल

 ‘आर यू अँन इमोशनल इटर?’ हा समीराचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल इटिंग हा खरंतर मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे समीरा सारखा प्रश्न आपणही स्वत:ला विचारुन पहायला हवा.
समीरा आपल्या या पोस्टमधे म्हणते की, लोकं सतत डाएट आणि पौष्टिक खाण्याबद्दल बोलत असतात. पण प्रत्यक्षात हे करुन, करण्यातलं सातत्य टिकवणं खूप अवघड आहे. समीरा स्वत:चा वजन घटवण्याबाबतचा अनुभव सांगताना म्हणते की, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मी नियमित व्यायामानं माझं 10 किलो वजन घटवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हण्जे मी ठरवून टाकलं आहे की ताणतून किंवा अति थकव्यातून होणारी खाण्याची इच्छा टाळायची. आणि मी यात यशस्वी झाले. समीरा म्हणते की, जेव्हा तुम्हाल उदास वाटत असतं, निराश वाटत असतं, खूप थकवा आलेला असतो तेव्हा आपल्याला पटकन उत्साही वाटण्यासाठी किंवा किक बसण्यासाठी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. मला आता जाणवतय की मी या जाणिवेवर मात केलेली आहे. मला खाण्यासाठी उद्युक्त करणारे ट्रिगर्स ओळखायला ते ताब्यात ठेवायला आणि आहारात समतोल राखायला मी शिकले आहे.
समीरा फक्त आपला इमोशनल इटिंग आणि वजन कमी करण्याचा अनुभव सांगून थांबत नाही तर इमोशनल हंगर आणि अँक्टयुअल हंगर अर्थात भावनिक भूक आणि प्रत्यक्ष भूक यातला फरक सांगून इमोशनल इटिंगवर मात करण्याचे मार्गही सांगते.

अँक्ट्युअल हंगर ( खरी भूक)

 * खरी भूक ही हळूहळू निर्माण होते. ती अचानक भयानक जाणवत नाही. खरी भूक हळूहळू लागते.
* खाताना पोट भरल्याचं जाणवतं आणि आपण समाधानानं खाणं थांबवतो.
* खरी भूक लागल्यानंतर जेव्हा खातो तेव्हा खाऊन झाल्यानंतर कधीही पश्चातापासारखी किंवा अपराधी वाटण्यासारखी नकारात्मक भावना निर्माण होत नाही.
* खरी भूक लागते तेव्हा काहीतरी एकाच प्रकारचं खावं असं वाटत नाही. वेगवेगळे पदार्थ जेवणात खावेसे वाटतात.

छायाचित्र- गुगल

 इमोशनल हंगर ( भावनिक भूक)

* ही भावनिक भूक अचानक जाणवते. ही भूक अस्वस्थ करते.
* एकामागून एक खात राहिलं तरी पोट भरत नाही.
* खाल्ल्यानंतर वाईट वाटतं. एवढं खायला नको होतं असं वाटायला लागतं.
* खाल्ल्यानंतरही चांगलं वाटेल असे पदार्थ खावेसे वाटतात.

छायाचित्र- गुगल

समतोल कसा साधणार?

1 . जेव्हा तुम्हाला सतत खावंसं वाटेल तेव्हा या जाणीवेवरुन स्वत:चं लक्ष दुसरीकडे वळवा. भरपूर पाणी प्या . यामुळे सतत खावंसं वाटणं थांबेल.
2. आपल्याला असं खावंसं का आणि केव्हा वाटतं हे शोधून काढा . शांत आणि जागरुक राहा.
3. रात्री पुरेशी आणि शांत झोप घ्या. यामुळे थकवा आणि ताण कमी होतो. झोप पुरेशी झालेली असल्यास दिवसा जेव्हा झोप किंवा मरगळ येते तेव्हा ती घालवण्यासाठी गोड खावंसंही वाटत नाही.
4. रात्री उशिरा खाऊ नये.
5. आपण एका वेळेस किती खातो आहे याकडे बारकाईनं बघा.
6. दिवसभर शरीराचं चलनवलन होत राहिल याकडे लक्ष द्या.
7. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला शांत करणारी जागा किंवा कारण शोधा जे मन अस्वस्थ असताना तुम्हाला शांत करण्यास मदत करु शकेल.

Web Title: Are you an emotional eater? Sameera Reddy explains what to do to avoid emotional eating. .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.