Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोळ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घेता? तुम्ही पोषण फेकून देतात, वाचा 5 तोटे

पोळ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घेता? तुम्ही पोषण फेकून देतात, वाचा 5 तोटे

कणकेच्या कोंड्यातच असतो पोळीचा कस. तोच काढून टाकला तर वजन वाढेल आणि ठेवला तर आरोग्य राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 07:48 PM2021-12-20T19:48:18+5:302021-12-20T19:55:01+5:30

कणकेच्या कोंड्यातच असतो पोळीचा कस. तोच काढून टाकला तर वजन वाढेल आणि ठेवला तर आरोग्य राहील उत्तम

Are you sift wheat flour for making roti.. If yes, then you sift your health by doing this | पोळ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घेता? तुम्ही पोषण फेकून देतात, वाचा 5 तोटे

पोळ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घेता? तुम्ही पोषण फेकून देतात, वाचा 5 तोटे

Highlights पोळी खाऊन फायदा मिळवायचा तर पीठ मळताना करा आधी विचार.कोंडायुक्त पोळी वजन कमी करण्यास फायदेशीर. कोंडा काढलेली पोळी तज्ज्ञ म्हणतात न खाणं उत्तम

सकाळचं जेवण पोळी भाजी, वरण भात, कोशिंबीर असणं महत्त्वाचं मानलं जातं. या जेवणात पोळी भाजी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. पोळीतला कस आणि भाज्यांमधील गुण यांचा मिलाफ होवून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. पण पोळ्या करताना होणार्‍या चुकांमुळे पोळीतून जायला हवेत असे पोषक घटक शरीराला मिळत नाही आणि त्यामुळे योग्य पोळीतून शरीराला मिळणार्‍या आरोग्यदायी फायद्यांपासून आपण वंचित राहतो. हे असं होवू नये म्हणून पोळी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात हे समजून घेणं गरजेचं आहे.

Image: Google

पोळ्या करताना चूक?

पोळ्या करताना गव्हाचं पीठ हे विकतचं असो किंवा आपण गहू दळून आणून केलेलं असो पोळ्यांसाठीची कणिक मळताना पीठ चाळून घेतलं जातं. ही सवय बहुतांश घरात असाते. पण ही सवय चुकीची असून यामुळे पोळीतून मिळू शकणारा कस या चुकीतून मिळत नाही.
पीठ चाळून घेऊन मळल्यावरच त्याच्या पोळ्या मऊ रेशमी येतात हा समज चुकीचा आहे. जो कोंडा आपण निरुपयोगी म्हणून पीठ चाळून झाल्यावर फेकून देतो त्याच कोंड्यात पोळ्यांचा कस आणि ताकद समाविष्ट असते. हा कोंडा फेकणं हीच पोळ्या करताना होणारी मोठी चूक असते. आरोग्यतज्ज्ञ म्हणतात कणिक चाळून कोंडा फेकून केलेली पोळी खाऊन फायदा नाही तोटाच होणार त्यापेक्षा ती न खाल्लेलीच बरी.

Image: Google

कोंड्यात काय असतं?

कोंड्यात कॅल्शियम, जीवनसत्त्वं, प्रथिनं, फायबर, सल्फर आणि लोह हे महत्त्वाचे आणि आरोग्यास फायदेशीर घटक असतात. कोंड्यायुक्त पिठाची पोळी खाल्ल्याने आरोग्यास एखाद दुसरा नाही तर अनेक लाभ होतात.

Image: Google

कोंडायुक्त पोळी का खावी?

1. कोंडा असलेल्या पिठाच्या पोळीमुळे पचन व्यवस्था आणि पचन क्रिया सुधारते. कारण कोंड्यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. पचन व्यवस्था नीट ठेवण्यासाठी फायबरची गरज असते. कोंडायुक्त पोळी खाल्ल्याने अपचन, अँसिडिटी, गॅस, पोट फुगणं यासारख्या पचनाशी निगडित समस्या निर्माण होत नाही. कोंड्याची पोळी खाल्ल्याने आतड्यात जमा झालेली घाण साफ होते. तसेच पित्ताशयाला झालेल्या इजा भरुन निघण्यास मदत होते.

2. मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी गव्हाच्या कणकेतला कोंडा फायदेशीर असतो. कोंडायुक्त कणकेच्या पोळीने रक्तातील साखर नियंत्रित राहाते. कोंडा काढून टाकलेली पोळी मधुमेहास कारणीभूत ठरते.

3. वजन कमी करण्यासाठी कोंडायुक्त कणकेची पोळी खाणं हा उत्तम उपाय आहे. कोंड्यामधे फायबर जास्त असतं. पोळीतील फायबरमुळे पोट खूप वेळ भरलेलं राहातं आणि म्हणूनच या पोळीनं वजन कमी होण्यास मदत होते. कणकेतील कोंडा काढून टाकल्यास अशा पिठाची पोळी खाल्ल्याने वजन हमखास वाढतं.

4. पिठातील कोंड्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोंडायुक्त पोळी खाल्ल्याने रक्तातील इम्यूनोग्लोब्युलिन्स हा घटक वाढतो. हा घटक टीबी आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढण्यास मदत करतो. तसेच कोंडायुक्त पोळी खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि अँनेमियाचा धोका टाळण्यास आणि अँनेमिया असल्यास तो बरा होण्यास मदत होते.

5. हदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी कोंडायुक्त पिठाची पोळी उपयुक्त ठरते. कारण यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होवून हदय रोगाचा धोका टळतो.

Web Title: Are you sift wheat flour for making roti.. If yes, then you sift your health by doing this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.