Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दमा, खोकला, सांधेदुखीचा त्रास? मग भेंडी खा..बघा भेंडीचे ५ फायदे

दमा, खोकला, सांधेदुखीचा त्रास? मग भेंडी खा..बघा भेंडीचे ५ फायदे

Benefits of eating lady finger: भेंडीला अगदीच अळणी, मिळमिळीत समजण्याची चूक करू नका.. हिवाळ्यात (winter food) भरपूर भेंडी खा... कारण तिचे फायदेच बघा किती जबरदस्त आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 01:30 PM2021-12-20T13:30:45+5:302021-12-20T13:34:35+5:30

Benefits of eating lady finger: भेंडीला अगदीच अळणी, मिळमिळीत समजण्याची चूक करू नका.. हिवाळ्यात (winter food) भरपूर भेंडी खा... कारण तिचे फायदेच बघा किती जबरदस्त आहेत...

Asthma, cough, joint pain? Then have okra water, Benefits of eating bhendi/ lady finger in winter | दमा, खोकला, सांधेदुखीचा त्रास? मग भेंडी खा..बघा भेंडीचे ५ फायदे

दमा, खोकला, सांधेदुखीचा त्रास? मग भेंडी खा..बघा भेंडीचे ५ फायदे

Highlightsआवडत नसली तरी भेंडीची भाजी आठवड्यातून एकदा- दोनदा नक्की खा.. कारण हिवाळ्यात भेंडी खाणं आराेग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

भेंडीची भाजी बच्चे कंपनीला आवडते.. पण तेच मात्र मोठ्यांच्या बाबतीत अगदी उलट आहे.. भेंडीची भाजी ताटात किंवा डब्यात पाहून अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. अळणी, मिळमिळीत असं म्हणून भेंडीला हिणवणारेही खूप आहेत... पण नुसतं तिच्या चवीवर जाऊ नका.. आवडत नसली तरी भेंडीची भाजी आठवड्यातून एकदा- दोनदा नक्की खा.. कारण हिवाळ्यात भेंडी खाणं आराेग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ओकरा वॉटर (okra water) म्हणजेच भेंडीचं पाणी पिणं, हा उपाय आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. फिटनेसबाबत सजग असणारे लोक हे पाणी पितात.. म्हणूनच भेंडीकडे दुर्लक्ष मुळीच नका... हिवाळ्यातील दमा, खोकला, घसा खवखवणे या आजारांसाठी तर भेंडी फायदेशीर (Benefits of eating bhendi/ lady finger in Marathi) आहेच, पण त्यासोबतच भेंडी इतरही अनेक आजारांवर उत्तम इलाज करते.. 


 
भेंडीमध्ये कॅल्शियम (calcium), पोटॅशियम (potassium), मॅग्नेशियम, झिंक (zinc) आणि लोह (iron) यांचे चांगले प्रमाण असते. त्यासोबतच भेंडीमध्ये व्हिटॅमिन के, सी, बी 6, बी 1, बी 2 (vitamin k, c, b6) देखील असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भेंडी फायदेशीर आहे.. शिवाय भेंडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजनवाढीची चिंता नाही. भेंडीमध्ये फॉलिक ॲसिडदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी भेंडी खाणे फायद्याचे ठरते. 

 

हिवाळ्यात भेंडी खाण्याचे हे ५ फायदे
Benefits of eating bhendi/ lady finger in winter season
१. खोकला, घसा खवखवणे, दमा

थंडीच्या दिवसात घसा खवखवणे, जुनाट खोकला, दमा उफाळून येणे असा त्रास वारंवार जाणवतो. घशात असणाऱ्या जंतुसंसर्गामुळे हा त्रास जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी भेंडी खाणं उपयुक्त ठरतं. कारण भेंडीमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल घटक असा त्रास कमी करतात. भेंडीमध्ये जंतुनाशक आणि ॲन्टीसेप्टिक गुणधर्म असल्याने घसादुखी, घसा खवखवणे यासाठी भेंडीचा रस म्हणजेच ओकरा वॉटर घेणेही फायदेशीर ठरते. 

 

२. सांधेदुखीसाठी फायदेशीर
हिवाळा सुरू झाला की अनेक जणांना सांधेदुखीचा त्रास होतो... तसेच हाडांचं जुनं दुखणं देखील हिवाळ्याच्या दिवसात उफाळून येतं.. हा त्रास कमी करण्यासाठी भेंडी खाणे फायदेशीर आहे. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.. त्यामुळे ओकरा वॉटर किंवा भाजीच्या माध्यमातून भेंडी अधिकाधिक पोटात जाईल याचा प्रयत्न करावा. 

३. वेटलॉससाठी उत्तम (weight loss)
लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी भेंडी खूपच फायदेशीर ठरते. कारण भेंडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज यांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींनाही भेंडी खाणे अधिक फायद्याचे ठरते. .

 

४. पचनशक्ती सुधारते (digestion)
भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे मळमळ, पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता यासारख्या त्रासांपासून आराम मिळण्यासाठी भेंडी खाणे फायद्याचे ठरते. भेंडी नियमितपणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

५. मधुमेहींसाठी फायदेशीर
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने तिचे पचन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे रक्तात साखर तयार होण्यासही वेळ लागतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण इतर पदार्थांच्या तुलनेत कमी वाढते. भेंडीची भाजी नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

 

कसे करायचे ओकरा वॉटर
How to make okra water? 

ओकरा वॉटर म्हणजेच भेंडीचे पाणी. ओकरा वॉटर तयार करण्यासाठी दोन मध्यम आकाराच्या भेंड्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या भेंड्यांची वरची आणि खालची देठे काढा. भेंड्यांना मधोमध उभी कापा. या भेंड्या एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजू द्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे पाणी पिणे खूपच आरोग्यदायी मानले जाते. 

 

Web Title: Asthma, cough, joint pain? Then have okra water, Benefits of eating bhendi/ lady finger in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.