Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

Weight Loss Tips: वजन कमी करताना ३ चुका मुळीच करू नका.. त्याचा तब्येतीवर कसा वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयी बघा आहारतज्ज्ञांचा हा खास सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 05:13 PM2023-09-07T17:13:10+5:302023-09-07T17:13:57+5:30

Weight Loss Tips: वजन कमी करताना ३ चुका मुळीच करू नका.. त्याचा तब्येतीवर कसा वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयी बघा आहारतज्ज्ञांचा हा खास सल्ला...

Avoid 3 mistakes while doing weight loss, 3 important tips for weight loss | वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

Highlightsकोणताही व्यायाम किंवा डाएट सुरू केल्यानंतर तुमच्या शरीराला १० ते १२ आठवड्यांचा वेळ द्या. त्यामुळे दर ३ महिन्यातून एकदा वजन तपासणं योग्य.

वाढतं वजन कमी करायचं किंवा ते आटोक्यात ठेवायचं, हे अनेकांसमोरचं आव्हान आहे. कोणी कोणी वाढत्या वजनाच्या बाबतीत अचानकच सतर्क होतात आणि मग वजन कमी करण्यासाठी खूपच जास्त कामाला लागतात. अगदी आठवडाभरातच आपल्या वजनात लक्षणीय फरक पडावा, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी मग हेवी डाएट किंवा खूप जास्त व्यायाम असं काहीतरी भलतंच करतात (Avoid 3 mistakes while doing weight loss). असं तर काही करू नकाच, पण त्यासोबतच पुढील ३ गोष्टी करणंही टाळा (3 important tips for weight loss), असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी दिला आहे. 

 

वजन कमी करताना ३ चुका करू नका
१. वारंवार वजन तपासणं

काही जणं वजन कमी करण्यासाठी एवढे उतावीळ असतात की अगदी रोजच वजनाच्या काट्यावर उभं राहून वजन तपासतात. पण असं करू नका.

फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी 

कोणताही व्यायाम किंवा डाएट सुरू केल्यानंतर तुमच्या शरीराला १० ते १२ आठवड्यांचा वेळ द्या. त्यामुळे दर ३ महिन्यातून एकदा वजन तपासणं योग्य. वजन कमी झालेलं नसेल पण तुम्हाला होणारे काही त्रास जर कमी झाले असतील, तर त्या सकारात्मक गोष्टीकडे अधिक लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही योग्य ट्रॅकवर चालला आहात, हे लक्षात घ्या.

 

२. दुसऱ्यांशी तुलना 
आपलं शरीर, आपला आहार, आपला व्यायाम, आपल्या कामाचं स्वरुप इतरांपेक्षा वेगवेगळे आहेत.

केस खूपच चिकट झाले? करा १ सोपा उपाय- केस होतील सिल्की आणि चमकदार

त्यामुळे अमूक एका व्यक्तीचं आठवडाभरात जेवढं वजन कमी झालं, तेवढं तुमचं झालंच पाहिजे, असं नाही. 

 

३. सतत अर्धपोटी राहणं टाळा
अनेक जणांकडून नियमितपणे व्यायाम केला जात नाही. त्यामुळे मग वजन कमी करण्यासाठी ते डाएट करतात.

कोवळ्या काकडीचं करा ‘ग्रीक कुकुंबर रायता’! ग्रीक चवीची ही कोशिंबिर सणावाराला करावी इतकी चविष्ट

डाएट म्हणजे सतत उपाशी, अर्धपोटी राहाणे नाही. त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादात कायम भुकेले राहात असाल, तर त्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो, आणि त्यातून भलतेच आजार मागे लागू शकतात. 

 

Web Title: Avoid 3 mistakes while doing weight loss, 3 important tips for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.