Join us  

दुपारच्या जेवणात काय खाता? ४ पदार्थ खाणं टाळा, अन्यथा पोट साफ व्हायला त्रास-वजनही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:51 PM

Avoid eating 4 foods for lunch : ऑफिसच्या ठिकाणी जे काही उपलब्ध होईल ते खातात. दुपारच्या जेवणात पोषक तत्वांचा समावेश असावा अन्यथा जेवणातील पोषण पुरेपूर मिळत नाही.

दिवसाची सुरूवात पोटभर नाश्ता करून करावी असं म्हटलं जातं. पण नाश्त्याप्रमाणे तुम्ही दुपारच्या जेवणात काय खाता हे सु्द्धा महत्वाचे असते. दुपारच्या जेवणात काय खायचं, काय नाही हे खूप कमी लोकांना माहित असतं. वेळेअभावी लोक घरात जे बनवलं असेल किंवा बाहेर ऑफिसच्या ठिकाणी जे काही उपलब्ध होईल ते खातात. दुपारच्या जेवणात पोषक तत्वांचा समावेश  असावा अन्यथा जेवणातील पोषण पुरेपूर मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारचं जेवण कधीच स्किप करू नये. (Foods That You Must Avoid in Lunch)

दुपारच्या जेवणात  पौष्टीक पदार्थांचा समावेश करा.  फास्ट  फूडचे सेवन चुकूनही करू नका.  यामुळे पचनक्रिया मंदावते. दुपारच्या जेवणाबरोबर कधीच कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका. यामुळे तुमची पचनक्रिया खराब होते आणि खाल्लेलं अन्न पचत नाही. ओव्हर इटींग करू नका. यामुळे तुमचं कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. (Things you should avoid eating for lunch)

दूध आणि केळी

अनेकदा घरात काही खास बनवलं नसेल तर लोक दूध आणि केळी खातात. दूधाबरोबर केळी मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया संथ होऊ शकते. रोज रोज हे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनात अडथळे येतात. अन्न पचण्यास वेळ लागतो आणि थकवा आल्यासारखं वाटते. कधीतरी खाल्ल्याने त्रास होणार नाही पण अगदी रोज खाऊ नका.

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

चहा

दुपारी चहा प्यायल्याने पोटाचे त्रास उद्भवू शकतात आणि पोट साफ व्हायलाही त्रास होऊ शकतो.  चहाचे सेवन रोज सकाळी नाश्त्याच्यावेळेस किंवा संध्याकाळी केले तर यामुळे होणारं नुकसान टाळता येतं.  

रोज चालता तरी पोट १ इंचही कमी होत नाही? ५ चुका टाळा, वजन पटापट कमी होईल-फिट दिसाल

फळं

फळांचे सेवन दुपारच्या जेवणात करू  नये.  फळांमध्ये न्युट्रिशनल वॅल्यू अससतात पण  पोट भरलेलं वाटत नाही. म्हणूनच  सकाळी नाश्त्याच्या वेळेस किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी फळं हा उत्तम पर्याय  आहे. 

ज्यूस

ज्यूस, मिल्क शेक यांसारखे लिक्वीड डाएट अनेकांना फार आवडते. या पदार्थांमुळे शरीराला ताकद मिळते पण प्रत्येकवेळी असं होईल असं नाही. तुम्ही दिवसाची सुरूवात करताना सकाळच्यावेळी ज्यूस पिऊ शकता, मधल्यावेळेत पिऊ शकता पण जेवणाच्या वेळी ज्यूस पिऊ नका. यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील.  शरीराला अन्नाची गरज असते अशात जर तुम्ही पेय पदार्थ जास्त घेतले आणि व्यवस्थित आहार घेतला नाही तर अशक्तपणा येऊ शकतो.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स