Join us  

'या' ५ चुका कराल तर व्यायाम- डाएट करूनही वजन कमी होणारच नाही, बघा नेमकं कुठे चुकतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 4:49 PM

Avoid These 5 Mistakes During Your Weight Loss Journey: व्यायाम- डाएट करूनही वजनाचा काटा खाली उतरतच नसेल, तर तुमच्याकडूनही या काही चुका होत आहेत का, एकदा तपासून पाहा... (5 habits that destroys metabolism and digestion)

ठळक मुद्देचयापचय क्रियेला अडथळा आणणारी काम आपण केली तर वजन कमी होऊ शकणार नाही. ही कामं नेमकी कोणती याविषयीची माहिती

बैठ्या कामाच्या पद्धतीमुळे वाढत्या वजनाची समस्या खूपच वाढत चालली आहे. काही जणांना व्यायामासाठी खरच वेळ नसतो, तर काही जणांना व्यायामाचा कंटाळा येतो. त्यामुळे शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत आणि दुसरं म्हणजे आहारात जंकफूडचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे वजन वाढीची समस्या घरोघरी दिसून येत आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काही लोक नियमितपणे व्यायाम करतात, डाएटिंग करतात (5 main reasons for weight gain). पण तरीही त्याचं वजन मात्र कमी होत नाही (Avoid these 5 mistakes during your weightloss journey). असं होण्याचं नेमकं कारण काय आणि त्यासाठी काय करावं, याविषयी बघा ही खास माहिती. (5 habits that destroys metabolism and digestion)

 

वजन वाढीचं मुख्य कारण म्हणजे चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचं मेटाबॉलिझम बिघडणे हे आहे. मेटाबॉलिझम क्रिया मंदावली तर खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्याची क्रिया संथ होते.

डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही- फक्त ३ पदार्थ वापरून तयार करा हर्बल डाय, केस काळेभोर

अन्नाचं व्यवस्थित पचन झालं नाही तर मग शरीरावर ठिकठिकाणी फॅट्स साठायला सुुरुवात होते. म्हणूनच चयापचय क्रियेला अडथळा आणणारी काम आपण केली तर वजन कमी होऊ शकणार नाही. ही कामं नेमकी कोणती याविषयीची माहिती hindustantimes.com यांनी शेअर केली असून ती डॉ. क्रिस्टिना तेलहामी यांनी दिली आहे. 

 

मेटाबॉलिझम- पचनक्रिया बिघडवणाऱ्या गोष्टी

१. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे आणि त्या तुलनेत मात्र आहारात पोषक पदार्थ खूप कमी प्रमाणात घेणे.

२. खूप जास्त ताण घेत असाल तर पचनक्रिया बिघडते.

नाश्ता करताना फक्त २ गोष्टी लक्षात ठेवा, नेहमीच राहाल फिट- वजनही वाढणार नाही

३. रात्री पुरेशी झोप घेत नसाल तर मेटाबॉलिझम आणि पचन क्रिया दोन्हीही बिघडतात.

४. नेहमीच लो कार्ब्स डाएट घेणेही आरोग्यासाठी चांगले नाही.

५. दररोज सकाळी रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी घेणे.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्स