Join us

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:00 IST

Weight Loss Mistakes: वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज सोबतच काय खाऊ नये असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Weight Loss Mistakes: वाढतं वजन ही आजकाल एक गंभीर समस्या बनली आहे. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एक्सरसाईज न करणं अशा कारणांमुळे जास्तीत जास्त लोक लठ्ठ होत आहेत. अशात वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज कोणती करायची आणि काय खाऊ नये? असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यात मदत मिळेल.

खाण्या-पिण्याच्या अशा अनेक लोकप्रिय गोष्टी आहेत ज्यात प्रोटीन आणि फायबर कमी असत. या गोष्टींमध्ये रिफाइन्ड कार्ब्स आणि फॅट्स जास्त प्रमाणात असतात. या गोष्टींमुळेच शरीरातील फॅट कमी होत नाही. अशाच काही गोष्टींबाबत आम्ही सांगत आहोत, ज्या तुमचं वजन कधीच कमी होऊ देत नाहीत.

1) फ्रेंच फ्राइज आणि बटाट्याचे चिप्स

तळलेले फूड्स जसे की, फ्रेंच फ्राइज आणि बटाट्याचे चिप्स यांमध्ये कॅलरी व फॅट भरपूर असतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, या गोष्टी खाल्ल्यास वजन वाढतं आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. त्याशिवाय बेक्ड, रोस्टेड आणि तळलेल्या बटाट्यांमध्ये एक्रिलामायड्स नावाचं तत्व असतं. जे कॅन्सरसंबंधी असतं. 

2) शुगर असलेले ड्रिंक्स

गोड ड्रिंक्स वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतात. यांमध्ये कॅलरी भरपूर असतात. हे पेय पिऊन आपलं पोट भरत नाही. ज्यामुळे शरीरात जास्त कॅलरी जातात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. 

3) पांढरे ब्रेड

पांढरे ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. ज्यामुळे वजन वाढतं आणि लठ्ठपणा वाढतो. यात ग्लूटन अधिक असतं. त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल तर पांढरे ब्रेड खाणं टाळलं पाहिजे. 

4) आइसक्रीम

बाजारात मिळणाऱ्या आइसक्रीममध्ये साखर आणि कॅलरी भरपूर असतात. ज्यामुळे नेहमीच आइसक्रीम खाणाऱ्यांचं वजन कमी होत नाही. जर आइसक्रीम आवडत असेलच तर साखर नसलेली खावी.

5) पिझ्झा

पिझ्झा वजन वाढण्यासाठी सगळ्यात कारणीभूत असतो. पिझ्झा अनेकांना आवडतो, पण यात मैदा आणि प्रोसेस्ड मीटचा वापर केला जातो. त्यामुळे पिझ्झा खाणं टाळलं पाहिजे.

6) फळांचे ज्यूस

बाजारात वेगवेगळ्या फळांचे ज्यूस पॅकेटमध्ये मिळतात. ज्यात साखर आणि सोडा भरपूर असतो. तसेच फळांच्या ज्यूसमध्ये फायबर नसतं. ज्यामुळे पचनासंबंधी समस्या होतात. यामुळे वजन कमी करण्यासही अडचण होते.

7) कॉफी

ब्लॅक कॉफी प्यायल्यानं तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न करण्यासही मदत मिळते. पण दुधाची कॉफी आणि साखर असलेली कॉफी पित असाल तर तुमचं वजन वाढतं.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स