नवरात्रीला अनेक जण नऊ दिवसांचे उपवास (navratri fast) करतात. काही जणांचे उपवास नवमीला सुटतात तर काही जणांचे उपवास दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सुटतात. उपवास करताना सुरुवातीचे दोन- तीन दिवस जरा त्रास होतो. पण नंतर मग पोटाला तसंच हलकं खाण्याची किंवा त्याच पदार्थांची सवय होऊ लागते. अशातच नऊ दिवसांनी जर काही जड पदार्थ आहारात घेतले तर मात्र पोट, तब्येत बिघडण्याचा त्रास अनेक जणांना होतो. म्हणूनच नऊ दिवसांचे उपवास सोडल्यानंतर लगेचच काही गोष्टी खाणं कटाक्षाने टाळायलाच पाहिजे (Avoid these food items after navratri fast).
नऊ दिवसांचे उपवास सोडल्यानंतर लगेच खाऊ नयेत असे पदार्थ
१. उपवासाच्या दिवसांत पोटाला हलके अन्न पचवायची सवय लागलेली असते. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर लगेचच तेलकट- तुपकट पदार्थ खाणं टाळालेलं बरं. अन्यथा जेवण न पचल्याने गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
डोक्यावर मातीचा कलश घेऊन सायकल चालवत करतेय डौलदार डान्स, बघा तरुणीचा व्हायरल व्हिडिओ
२. उपवास सोडल्यानंतर पुढचे एक- दोन दिवस आंबट फळं खाणं टाळा. शक्य असेल तर लिंबू पाणी घेणंही टाळा. यामुळे ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
३. उपवासाच्या काळात अनेकांना शुगर कमी झाल्याचा त्रास जाणवतो. अशावेळी उपवास सुटल्यानंतर एकदम गोड पदार्थांवर ताव मारु नका. थोडे थोडे गोड पदार्थ खा.
उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे
४. तसेच उपवास सुटल्यानंतर लगेचच चहा- कॉफीचे अतिरिक्त सेवन करणे टाळा. यामुळे भुकमोड होते, शिवाय ॲसिडिटी वाढते. त्यामुळे दिवसातून दोन कपपेक्षा अधिक चहा- कॉफी पिणे टाळा.
५. उपवास असताना वेगवेगळे चटकदार पदार्थ खावे वाटतात. मग उपवास सोडल्यानंतर काय काय खायचं, याचं अनेक जण प्लॅन करतात. पण उपवास सोडल्यानंतर लगेच जंकफूडवर ताव मारणार असाल, तर तो विचार आताच रद्द करून टाका.