आयुर्वेदानुसार जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यास भोजन अत्याधिक महत्वपूर्ण आहे. शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जेवण फार महत्वाचे असते. चरक संहितेत सांगण्यात आले आहे की आदर्श आहाराने आनंद, पोषण, बल आणि बुद्धी प्राप्ती होते. (Ayurvedic Healthy Eating Rules And What Is The Best Time For Breakfast Lunch And Dinner According To Ayurveda)
आर्ट ऑफ लिविंग श्री श्री वेलबिइंगच्या आयुर्वेद विशेषज्ञ डॉ. नितिश पठानिया यांच्यामते जेवणाची योग्य वेळ, प्रमाण, प्रकार आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. आयुर्वेदानुसार जेवण करण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती ते समजून घेऊ.
आयुर्वेदानुसार जेवणाचे ८ नियम कोणते
1) प्रकृति - जेवणाची विशेष प्रकृति किंवा गुण असतो. जसं की हिरवे मूग हलके असतात जर काळी उडीद जड असते.
2) करण - जेवण तयार करण्याच्या पद्धतीमुळे जेवणाच्या गुणवत्ता प्रभावित होते.
3) संयोग- जेवणाचे योग्य संयोजन जसं की दूधाबरोबर विसंगत खाद्यपदार्थ खाणं टाळायला हवं.
4) राशि- जेवणाचे प्रमाण आणि उचित पोषण आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.
5) देश- अन्न उगवण्याचे स्थान, माती, जलवायू या गुणांचा प्रभाव पडतो.
6) काल - जेवणाची वेळ, ज्यात दिवस किंवा रात्रीच्या आधारावर जेवणाचे प्रमाण आणि प्रकार यांचे विभाजन केले जाते.
7) उपयोग संहिता- जेवणाचे नियम, जे योग्य पचन आणि रोगांपासून बचावासाठी आवश्यक आहे.
८) उपयोक्ता- जेवण करणारी व्यक्ती, ज्याची शारीरिक, मानसिक स्थिती याचा अन्न पचनावर परिणाम होतो.
आदर्श जेवणाची वेळ
आयुर्वेदात निरोगी जीवनसाठी आदर्श भोजनाची वेळ ही दिवसातून २ वेळेसची असते. ज्याला द्वि अन्नकाल असं म्हटलं जातं. प्राचीन काळात लोक याचवेळेला तालिका पालन करत होते. पण आजकाल ३ वेळा जेवण जेवण करणं सामान्य आहे. आयुर्वेदानुसार मुख्य जेवणाची वेळ पित्त कालादरम्यान म्हणजे दुपारी ११ ते १ वाजचादरम्यान असतो. ज्यामुळे पचन अग्नी सगळ्यात प्रबल असते. जेवण व्यवस्थित पचण्यात मदत होते.
जेवणावर लक्ष केंद्रीत करणं महत्वाचं
डॉ. पठानिया सांगतात की जेवण करताना अन्नाकडे लक्ष केंद्रीत करणं फार महत्वाचे आहे. आजकाल लोक टिव्ही पाहताना किंवा इतर गोष्टी करताना जेवण करतात ज्यामुळे जेवणावरून लक्ष हटतं. आयुर्वेदानुसार मन आणि पोट यांचा घनिष्ट संबंध आहे. पचन व्यवस्थित होते.
जेवणाची वेळ वयानुसार वेगळी
जेवणाची योग्य वेळ प्रत्येकाच्या वयानुसार भिन्न असू शकते १ ते ८ वर्षांच्या मुलांचे भोजन पौष्टीक असायला हवे. जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा जेवण द्यायला हवं. सुर्यास्ताच्या वेळी जेवण करावं.
वात असलेल्या लोकांचा भूकेची वेळ वेगवेगळी असते. वेळेवर आहार न घेतल्यास तब्येतीवर परिणाम होतो. पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी आपल्या आहारात ताकाचा समावेश करावा. कफ प्रकृतीचे लोक जास्तवेळ उपवास सहन करू शकतात. जेवणाची वेळ आणि प्रकार व्यक्तीच्या प्रकृतीनुसार निर्धारीत असतो. सर्वांसाठीच एक नियम सारखा आहे की रात्रीचं जेवण सुर्यास्ताच्या आधी करावं. आयुर्वेदानुसार सिद्धांत सांगतात की जेवण ताजं आणि स्वच्छ असायला हवं. शिळं किंवा पॅकेज्ड अन्न खाऊ नये. जेवण निर्धारीत वेळेवर घेत राहा. भूक लागो किंवा न लागो आपल्या वेळेवर जेवण करत राहा. जेवणाचे व्यवस्थित पचन होईपर्यंत दुसरे अन्न घेऊ नये.