Join us  

पोट कमीच होत नाहीये? रामदेव बाबा सांगतात खास खिचडीची रेसेपी; रोज खा-महिन्याभर स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 4:50 PM

Baba Ramdev Shares Khichdi Recipe For Weight Loss : खिचडीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढते, पचनक्रिया चांगली राहते याशिवाय शरीर क्लिन होण्यासही मदत होते. हे एक बॅलेन्स फूड आहे.

वाढलेलं पाोट कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण एकदा ओव्हर इटींगमुळे किंवा सतत बसल्यामुळे पोट सुटलं तर ते कमी करणं खूपच कठीण होतं.  (Foods For Weight Loss) पोट कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स घेऊनही फारसा फायदा दिसून येत नाही. एकदा वजन वाढलं की थायरॉईड, हायपर  टेंशन, कोरोनरी आर्टरी डिससीज, फॅटी लिव्हर, हाय कोलेस्टेरॉल अशा समस्या उद्भवतात. अशात फक्त चांगली पर्सनॅलिटीच तुम्हाला गंभीर आजारांपासून लांब ठेवू शकते.( Baba Ramdev Special Diet For Weight Loss Dalia To Burm Belly Fat Quickly)

योगगुरू बाबा रामदेव यांनी वाढलेलं वजन कमी करण्यासाठी एक सोपी रेसिपी शेअर केली आहे.(Khichdi For Weight Loss)  एका यु ट्यब व्हिडिओमध्ये बाबा रामदेव वजन कमी करण्यासाठी खास धान्य तयार  करताना दिसत आहेत. रामदेव बाबा यांच्यामते या डाळीचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला वजनात फरक दिसून येईल.

बी बॉडी वाईजच्या रिपोर्टनुसार खिचडीच्या एका सर्विंगमध्ये जवळपास ३२० कॅलरीज असतात. त्यात १९ टक्के प्रोटीन,  ३६ टक्के कार्ब्स  आणि १३ टक्के फॅट्स असतात. आयुर्वेदात खिचडी खाण्याचे बरेच फायदे प्रचलित आहेत.  खिचडीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढते, पचनक्रिया चांगली राहते याशिवाय शरीर क्लिन होण्यासही मदत होते. हे एक बॅलेन्स फूड आहे ज्यामुळे  वजन कमी होण्यातही फायदा होतो. 

हा पदार्थ तयार करण्यासाठी गहू, बाजरी, तीळ, तांदूळ, ओवा या धान्यांची आवश्यकता असेल. हे सर्व पदार्थ मिक्स करून खिचडी बनवून खाल्ल्यास पोटाच्या वाढत्या चरबीपासून सुटका मिळू शकते.  या पौष्टीक आहाराचा रोजच्या रूटीनमध्ये समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

मिक्स धान्यांच्या खिचडीचा आहारात समावेश करून वजन कसे कमी करता येते?

१) यात कॅलरीज खूप कमीत कमी प्रमाणात असतात. हे मल्टीग्रेन फूड असल्यामुळे  प्रोटीन्सचे प्रमाणही जास्त असते यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि सतत खात राहण्याच्या क्रेव्हींग्सही कमी होतात. 

२) गहू, ज्वारी, बाजरी, तीळ, ओवा यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे जास्तवेळ पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही ओव्हरइटींग करत नाही.

३) आयर्न आणि कार्बोहायड्रेट्स हे दोन्ही पदार्थ शरीराला मिळतात. ज्यामुळे दिवसभर शरीर एर्नेजेटीक राहते आणि वाढत्या वजनावरही नियंत्रण ठेवता येते

टॅग्स :वेट लॉस टिप्सरामदेव बाबा