आपण आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खूपदा ऐकले असेल. त्यांचा हा वजन कमी करण्याचा प्रवास पाहून आपण देखील भारावून जातो, मात्र खरोखर भारावून जावं अशी एक गोष्ट झोमॅटोचे (Zomato) सीईओ (CEO) दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) सांगतात. त्यांनी तब्बल १५ किलो वजन नुकतेच कमी केले आहे, त्यांनी स्वत:च इन्स्टाग्रामवर आपला फिट होण्याच प्रवास मांडला आहे. लाइफस्टाइल, स्ट्रेस, कामाचा ताण आणि वजन यासाऱ्यांचा मेळ घालत फिट होण्याची ही गोष्ट खरोखर वेगळी आहे(Zomato CEO Deepinder Goyal shares weight-loss journey and how he managed to lose 15 kg).
१५ किलो वजन कमी करण्याचा प्रवास...
झोमॅटोचे (Zomato) सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी २०१९ ते २०२३ पर्यंतचा ४ वर्षांचा प्रवास कसा होता. या प्रवासात आलेले अनुभव मांडले आहेत. इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या वजन कमी करण्याच्या संदर्भातील दोन मुख्य नोट्स शेअर केल्या आहेत. वजन, कोलेस्टेरॉलची पातळी आणि शरीरातील चरबीची टक्केवारी ते सांगतात. २०१९ मध्ये त्यांचे वजन ८७ किलो होते, तर गोयल यांनी २०२३ मध्ये ते ७२ पर्यंत खाली आणले. त्यांच्या कोलेस्टेरॉलची पातळी आणि शरीरातील चरबीची टक्केवारी देखील कमी झाल्याचे या नोट्समधील आकडेवारी सांगत आहे. याचबरोबर त्यांची कोलेस्ट्रॉल पातळी १६५ वरून ५५ पर्यंत खाली आली होती तर शरीरातील चरबीची टक्केवारी २८ वरून ११.५ टक्क्यांवर आली होती. "चांगला आहार हे एखाद्याच्या फिटनेस प्रवासातील ८० % काम सोपे करते. असं ते सांगतात.
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
२०१९ मध्ये कोरोनाची महामारी भारतात येण्यापूर्वी दीपिंदर गोयल यांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. या काळात डाएट, वर्कआऊटसोबतच सातत्य त्यांनी कायम ठेवले. आपल्या डाएटबद्दल अधिक माहिती सांगताना ते म्हणाले " मी माझ्या रोजच्या डाएटमध्ये कार्बयुक्त आहार घेण्यावर अधिक भर दिला होता. मी काही जगावेगळं डाएट केलं नाही. प्रत्येक आठवड्याच्या शेवटचे एक किंवा दोन दिवस हे चीट डे होते, आणि मी माझे चीट डे पण माझ्या आवडीचे पदार्थ खाऊन एन्जॉय केले. पण एकंदरीतच, मी माझ्या डाएट टाइम टेबलशी अतिशय प्रामाणिक होतो.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होते? ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
जाॅगिंग रोज करण्याचा फायदा होतो की तोटा ? ५ गोष्टी जॉगिंग करतानाच काय चालतानाही विसरु नका...
दिवसेंदिवस अति लठ्ठपणा व वाढते वजन ही समस्या जोर धरत आहे. आपल्यापैकी बरेचजण वाढत्या वजनाने हैराण झालेले असतात. उत्तम कामासाठी चांगले आरोग्य असणे अत्यंत महत्वाचे असते. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांचेही आरोग्य व फिटनेसकडे लक्ष देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दीपिंदर गोयल यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिमची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. झोमॅटोच्या ऑफिसेसमध्ये एक फिटनेस टीम ऍक्टिव्ह असेल जी कर्मचाऱ्यांना त्यांचे आरोग्य व फिटनेस कसे सांभाळावे याबाबत मार्गदर्शन करेल. महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी मासिक पाळी, सरोगसी आणि दत्तक बाळ सांभाळणारे पालक, समलिंगी पालक यांच्यासाठी ६ महिन्यांची रजा देणारी पॅरेंटल लीव्ह देण्याचे सांगितले आहे.