Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

How to Make Badishep Sharbat: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. अशा उष्णतेत शरीराला थंडावा देण्यासाठी प्या बडीशेप सरबत.. बघा ही चवदार सोपी रेसिपी (Badishep Sharbat recipe).. वेटलॉससाठीही (helps for weight loss) हे सरबत अतिशय उपयुक्त आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 01:22 PM2022-03-19T13:22:49+5:302022-03-19T13:23:50+5:30

How to Make Badishep Sharbat: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. अशा उष्णतेत शरीराला थंडावा देण्यासाठी प्या बडीशेप सरबत.. बघा ही चवदार सोपी रेसिपी (Badishep Sharbat recipe).. वेटलॉससाठीही (helps for weight loss) हे सरबत अतिशय उपयुक्त आहे..

Badishep or Fennel seeds sharbat : super cool drink for summer, helps for digestion and weight loss | उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

Highlightsबडीशेप आणि खडीसाखर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. बडीशेपेत फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनासाठी उत्तम असते.

उन्हाळ्यात एकवेळ जेवण नको वाटतं, पण सतत काहीतरी थंडगार, शरीराला आणि मनाला थंडावा मिळेल असं खावं वाटतं, प्यावं वाटतं.. त्यामुळेच तर जवळपास सर्वच घरांमध्ये उन्हाळ्यात सरबतांची रेलचेल असते. बडिशेप पाचक असते, हे आपण जाणतोच. त्यामुळे जेवण झालं की हमखास थोडीशी बडीशेप तोंडात टाकलीच जाते. याच बडीशेपेचं मस्त, चवदार सरबत करा.. उन्हाळ्यात बडीशेपेचं सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय बडीशेपेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने वेटलॉससाठीही हे सरबत उपयुक्त ठरतं.. बडीशेपेचं चवदार सरबत कसं करायचं आणि त्याचे इतर फायदे कोणते, याची माहिती घेऊया..

 

कसं करायचं बडीशेप सरबत?
How to make Badishep Sharbat

बडीशेप सरबताची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या nikiceipe या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.
बडीशेप सरबत करण्यासाठी आपल्याला पाव कप बडिशेप fennel seeds, पाव कप खडी साखर, ३ विलायची, २ ग्लास थंड पाणी, १ टीस्पून काळं मीठ, १ टेबलस्पून लिंबूचा रस, १ टेबलस्पून सब्जा हे साहित्य लागणार आहे..
बडीशेप सरबत रेसिपी
- बडीशेप, विलायची, खडीसाखर यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्या. ही पावडर तुम्ही १०- १५ दिवस स्टोअर करून ठेवू शकता. 


- सब्जा पाण्यात भिजत ठेवून द्या.
- मिक्सरमधून केलेली बारीक पावडर एक भांड्यात काढा. त्यात काळं मीठ, लिंबाचा रस टाका. 
- हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की त्यात पाणी टाका.
- सरबत तयार झालं. आता ग्लासमध्ये सर्व्ह करताना सगळ्यात आधी भिजवलेला सब्जा टाका. त्यात सरबत ओता आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून थंडगार सरबत पिण्याचा आस्वाद घ्या.

 

बडीशेप सरबत पिण्याचे फायदे (benefits of drinking badishep sharbat)
- बडीशेप आणि खडीसाखर हे दोन्हीही शरीराला थंडावा देणारे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना बडिशेप सरबत पिणे आरोग्यदायी ठरते.
- बडीशेपेत फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनासाठी उत्तम असते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त.
- शरीरातील चांगल्या कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढण्यासाठी मदत करते.
- बडीशेप आणि खडीसाखर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. 


 

Web Title: Badishep or Fennel seeds sharbat : super cool drink for summer, helps for digestion and weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.