वजन वाढण्यास जसे खाण्या पिण्याचे पदार्थ कारणीभूत ठरतात, त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासही पदार्थांचा उपयोग होतो. वजन कमी करताना काही खायचं सोडायचं म्हटलं तर झाल्यास फळांमधे केळ खाणं सोडून दिलं जातं. का तर केळानं वजन वाढतं. पण तज़्ज्ञ म्हणतात की, हा गैरसमज आहे. केळामुळे वजन वाढत नाही उलट कमी होतं. केळ खाण्याची विशिष्ट पध्दत आणि वेळ असते. ती पाळल्यास केळ वजन कमी करण्यास प्रभावी ठरतं. वजन कमी करण्यासाठी अपल्या वेटलॉस डाएटमधे केळाला डावलण्यापेक्षा केळाच्या स्मूदीचा अवश्य समावेश करावा. केळाची स्मूदी घेतल्यानं पौष्टिक आहार मिळून शरीराचं पोषण होतं आणि वजनही कमी होतं.
Image: Google
केळाची केवळ स्मूदीच नाही तर केळ आणि केळापासून बनवलेला कोणताही पदार्थ हा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो. केळ आणि केळाचे पदार्थ हे व्यायाम करण्याआधी खावेत. यामुळे व्यायाम करायला ऊर्जा मिळते,व्यायाम जास्त करण्याची ऊर्जा आणि ताकद शरीराला मिळते. वजन कमी होण्यास हे फायदेशीर ठरतं.
कोलंबिया आशिया हॉस्पिटलमधे जेष्ठ आहारतज्™स असलेल्या डॉ. अदिती शर्मा सांगतात की, केळ म्हणजे फायबर, पोटॅशियम आणि अँण्टिऑक्सिडण्य्टसचा खजिना आहे. हे सर्व घटक केवळ शरीरासाठी पोषकच असतात असं नाही तर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ते मदत कततात. तसेच केवळ केळ खाल्ल्यानेही स्नायुंची ताकद वाढते. पोटावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत मिळते.
Image: Google
केळाची स्मूदी कशी कराल?
केळाची स्मूदी तयार करण्यासाठी 1 पिकलेलं केळ, 1 संत्रं,1 चमचा खोबर्याचं तेल, 2 चमचे व्हे प्रोटीन पावर,पाव चमचा सूंठ पावडर, थोडं फॅट फ्री दही, दोन चमचे जवस एवढी सामग्री घ्यावी.
हे सर्व साहित्य एकत्र करावं आणि मिक्सरच्या भांड्यात किंवा ब्लेण्डरने ते बारीक वाटून घ्यावं. हे मिश्रण स्मूदीला जसं हवं तसं मऊसर झालं की ते मिक्सरच्या भांड्यातून ग्लासमधे काढावं . व्यायामाच्या अर्धा ते पाऊण तास आधी ही केळाची स्मूदी प्यावी. या स्मूदीचे चांगले परिणाम शरीरावर दिसण्यासाठी ही स्मूदी सकाळी उठल्यावर दिवसभरातला पहिला अहार म्हणून घ्यावा.
Image: Google
केवळ केळ आणि केळाचे पदार्थ यांचा आहारात जाणीवपूर्क समावेश केल्यानं आणि त्याचं सेवन करुन वजन घटवता येतं. त्यासाठी खूप काही फॉर्म्युले शोधण्याची गरज नाही असं अभ्यासक आणि आहार तज्ज्ञ म्हणतात. पण केवळ रोज केळाची स्मूदी घेतो आहोत, म्हणून व्यायाम सोडून दिला तर कसं चालेल? पुरेसा व्यायाम, केळ आणि केळाची स्मूदी हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यास प्रभावी ठरेल. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात, वजन कमी करण्यासाठी व्यायामाच्या दिनचर्येत एक ग्लास केळाच्या स्मूदीचा अवश्य समावेश करावा. ही निरोगी दिनचर्या केवळ वजन कमी करते असं नाही तर एकूणच आरोग्याचीही काळजी घेते.