Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं तर हे रॉयल हर्ब ड्रिंक प्या! म्हणजे, आपले तुळशीचे पाणी.. घ्या फॉर्म्युला

वजन कमी करायचं तर हे रॉयल हर्ब ड्रिंक प्या! म्हणजे, आपले तुळशीचे पाणी.. घ्या फॉर्म्युला

तुळशीची पानं खाणं तसेच तुळशीचा काढा पिणं हे जितकं आरोग्यदायी आहे तितकंच तुळशीचं पाणी पिणंही. निरोगी राहाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो. विशेषत: थंडीमधे तुळशीचं पाणी नियमित पिल्यास वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 06:31 PM2021-11-15T18:31:17+5:302021-11-15T18:35:44+5:30

तुळशीची पानं खाणं तसेच तुळशीचा काढा पिणं हे जितकं आरोग्यदायी आहे तितकंच तुळशीचं पाणी पिणंही. निरोगी राहाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो. विशेषत: थंडीमधे तुळशीचं पाणी नियमित पिल्यास वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे होतात.

Basil water formula for loose weight | वजन कमी करायचं तर हे रॉयल हर्ब ड्रिंक प्या! म्हणजे, आपले तुळशीचे पाणी.. घ्या फॉर्म्युला

वजन कमी करायचं तर हे रॉयल हर्ब ड्रिंक प्या! म्हणजे, आपले तुळशीचे पाणी.. घ्या फॉर्म्युला

Highlightsतुळशीचं पाणी पिल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.व्यायाम करण्याआधी तुळशीचं पाणी पिल्यास शरीरातील जास्तीचे उष्मांक जळण्यास, पोट कमी होण्यास मदत होते.तुळशीतील गुणधर्म हार्मोन्समधील असंतुलन रोखतात आणि त्यामुळे वजन वाढण्यास अटकाव होतो.

तुळशीला ‘रॉयल हर्ब’ म्हणून ओळखलं जातं. याला कारण म्हणजे तुळशीमधील गुणधर्म. अनेक आजरांना दूर ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. नैसर्गिक उपचारांमधे तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या सेवनानं वजन कमी होतं. कारण तुळशीच्याब पानांमधे उष्मांक कमी असतात आणि त्यात पोषक घटक मात्र जास्त असतात. तुळशीमधे पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि क जीवनसत्त्वं आतं. तुळशीची पानं खाणं तसेच तुळशीचा काढा पिणं हे जितकं आरोग्यदायी आहे तितकंच तुळशीचं पाणी पिणंही. निरोगी राहाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो. विशेषत: थंडीमधे तुळशीचं पाणी नियमित पिल्यास वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे होतात. 

Image: Google

तुळशीचं पाणी का प्यावं?

1. तुळशीचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चयापचय क्रिया सुधारते. या पाण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात. तसेच अन्नाचं ऊर्जेत रुपांतर करण्यास आणि अन्न घटकातील पोषक द्रव्यं शरीराकडून शोषून घेण्यास तुळशीचं पाणी पिल्यानं फायदा होतो.

2. शरीरातील अनावश्यक आणि घातक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी तुळशीतील गुणधर्म प्रभावी असतात. म्हणूनच तुळशीचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीर सुदृढ तर राहातचं सोबतच शरीरातील विषारी घटकांचा निचरा झाल्यानं वजनही कमी होतं.

Image: Google

3. तुळशीचं पाणी नियमित पिल्यानं पचनक्रिया सुधारते. तुळशीच्या पाण्यामुळे आतड्यातील चांगले जिवाणू वाढतात, आतड्यांची हालचाल योग्य रितीने होते. याचाच फायदा वजन कमी होण्याच्या प्रक्रियेवर होऊन वजन कमी होतं.

4. तुळशीच्या पानांमधे कमी उष्मांक असतात. पण तुळशीच्या पानांचं पाणी पिल्यानं शरीराची ताकद वाढते. व्यायाम करण्याआधी तुळशीचं पाणी पिल्यास व्यायामाद्वारे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळण्यास, पोट कमी होण्यास मदत होते.

5. तुळशीमधे असलेल्या अँण्टिऑक्सिडण्टसमुळे शरीरातील संप्रेरकांचं ( हार्मोनचं) संतुलन राखलं जातं. वजन वाढीस संप्रेरकांचं असंतुलन प्रामुख्यानं कारणीभूत ठरतं. तुळशीमधील या गुणधर्मामुळे वजन आटोक्यात राहातं.

Image: Google

तुळशीचं पाणी कसं करायचं?

तुळशीची दहा ते बारा पानं घ्यावीत. ती धुवावीत. एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात ही धुतलेली तुळशीची पानं टाकावीत. पाणी चांगलं उकळावं. पाणी उकळून त्याचा थोडा रंग बदलला की गॅस बंद करुन ते पाणी गाळून घ्यावं. हे पाणी अगदी कडक नाही पण गरम गरमच प्यावं. यामुळे शरीरातील चरबी कमी होवून वजन कमी होतं. तुळशीचं पाणी सकाळी उठल्यानंतर तोंड धुवून रिकाम्या पोटीच प्यावं.

Web Title: Basil water formula for loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.