Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:06 PM2023-05-18T12:06:05+5:302023-05-18T14:32:48+5:30

Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा.

Belly Fat loss Tips : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

पोटाच्या जवळपास बरीच अतिरिक्त चरबी जमा होते. यामुळे गंभीर समस्या उद्भवतात. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी जमा होते. (How To Lose Belly Fat) टमी फॅट वाढल्यानंतर त्यापासून सुटका मिळवणं कठीण होतं. पोटावरची अतिरिक्त चरबी दूर करण्यासाठी व्यायाम आणि डाएट फॉलो करणं खूप गरजेचं असतं. (Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. (How to get rid of belly fat) जिमला जायला वेळ नसेल तर घरीच सोपे व्यायाम करा. हा बेली फॅट घटवण्याचा उत्तम उपाय आहे. जिमला जाण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर घरीच काही सोपे व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

बेली फॅट कमी करण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन्स मिळाले तर चांगला आहार घेऊन वजन कमी करू शकता. बेली फॅट कमी करण्यासाठी आणि पोटावर जमा झालेली चरबी घटवण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. डाएटिशिनय मनप्रीत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

इंसुलिन सेंसिटिव्ह ग्लुकोज आपल्या पेशींपर्यंत पोहोचण्यास महत्वाची भूमिका बजावतात. इंसुलिन रेजिस्टेंसमुळे आपल्या सेल्समध्ये ग्लूकोज योग्य पद्धतीनं शोषलं जात नाही. यामुळे फॅट लिव्हर ग्लूकोजमध्ये बदलतात. तेव्हा फॅट शरीरात जास्तीत जास्त जमा होतं. सर्वाधिक फॅट पोटाजवळ जमा होतं. प्रोटीन इंसुलिन सेंसेटिव्हिटी सुधारण्यास मदत होते. हे ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखते आणि फॅट लॉस होते. 

42 व्या वर्षीही तरूण दिसणाऱ्या जुही परमारचं फिटनेस सिक्रेट; 'अशी' राहते फिट

मसूर डाळ आणि भाज्यांपासून बनलेला हा डोसा इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारण्यात आणि पोटावर जमा झालेली चरबी सुधारण्यास उत्तम आहे. यात मसाल्यांचाही वापर केला जातो. वेटलॉसमध्येही हा डोसा फायदेशीर आहे. इंसुलिन सेंसिटिव्हीट सुधारण्यासाठी मदत होते. याशिवाय भाज्यांमधील फायबर्स आतड्यांमधील मुव्हमेंट कमी होते. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि सैंधव मीठ डायडेशन सुधारते तर काळी मिरी, दालचिनी आणि जायफळ इंसुलिन सेंसिटिव्हीटी सुधारते.हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कप मसूर डाळ घ्या  आणि रात्रभर ही डाळ भिजत ठेवा. सकाळी रात्री भिजवलेली डाळ वाटून घ्या.

५ फळं आणि भाज्या रोज खा, कॅल्शियमचा खजाना-म्हातारपणातही शरीरातील सगळी हाडं राहतील ठणठणीत

या पेस्टमध्ये शिमला मिरची, गाजर या भाज्या घाला. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यात घालू शकता. चमचाभर काळी मिरी, मीठ, दालचिनी आणि जायफळ घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि त्याचा डोसा बनवा. तयार आहे वेटलॉसचा खास डोसा.

Web Title: Belly Fat loss Tips : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.