वजन कमी करणं सोपं काम नाही. (Belly fat Loss Tips) स्ट्रिक्ट डाएट आणि हेवी व्यायाम केल्यानंतरही अनेकदा वजन कमी होत नाही. जर तुम्ही सुद्धा पोट आणि कंबरेची चरबी कमी करू इच्छित असाल तर काही सोपे आयुर्वेदीक उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. महागडं डाएट करण्याच्या नादात आपण बऱ्याच घरगुती पौष्टीक पदार्थांकडे दुर्लंक्ष करतो. स्वंयपाकघरातील काही पदार्थांचे नियमित सेवन केल्यास तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (How fibre in neem flower helps in weight loss burning fat)
कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराचे याचे अधिकाधिक फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाची पानं फायदेशीर ठरतात. (Neem Benefits) अनेक आयुर्वेदीक एक्सपर्ट्सकडून कडुलिंबात असलेल्या औषधी गुणांबाबत सांगितले जाते. कडुलिंबाची फुलंसुद्धा तितकीच गुणकारी ठरतात. मुळापासून पानांपर्यंत प्रत्येक भाग औषधी गुणांनी परिपूर्ण असतो.
वजन कमी करण्याचं फायदेशीर ठरतं कडुलिंबाचे फूल
यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होऊन अन्न पचन लवकर होतं. याशिवाय शरीरातील कॅलरीज वेगानं बर्न होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेच्या समस्या दूर करम्यासाठी हे प्रभावी ठरते. यामुळे भूक नियंत्रणात राहते. वारंवार खाण्याची इच्छा उद्भवत नाही. कडुलिंबात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट (Digestion) दीर्घकाळ भरलेले राहते.
ओटी पोट लटकतंय, फिगर पूर्ण बिघडली? रोज सकाळी ४ गोष्टी करा, आपोआप स्लिम-फिट दिसाल
कडुलिंबाच्या फुलाने वजन कसे कमी करावे
सकाळी उठल्यानंतर ताजी कडुलिंबाची फुलं तोडून त्याचे रिकाम्या पोटी सेवन करावे. याव्यतिरिक्त तुम्ही कडुलिंबाची नाजूक पानं सुद्धा खाऊ शकता. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
दुसरी पद्धत
वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाचे फूल आणि मधाचे सेवन तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी कडुलिंबाच्या फुलांना खलबत्त्यात व्यवस्थित वाटून घ्या. हे मिश्रण एका वाटीत काढून त्यात मध मिसळा. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रसही तुम्ही मिसळू शकता. सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करा.
अंगकाठी बारीक पण दंड जाड-थुलथुलीत दिसतात? १० मिनिटं करा हा व्यायाम-हात दिसतील सुंदर
तिसरी पद्धत
वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या फुलांचा चहा सुद्धा फायदेशीर ठरतो. हा चहा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप पाण्यात कडुलिंबाची ताजी फुलं घालून उकळून घ्या त्या आल्याचा रस मिसळून प्या. दिवसभरात फक्त १ कप या चहाचे सेवन करा.