चुकीची लाईफस्टाईल तुमच्या शरीराचं नुकसान करू शकते. (Fitness Tips) यामुळे पोट सुटतं आणि कपड्यांची फिटींग व्यवस्थित बसत नाही. आरश्यासमोर उभं राहिल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित दिसत नसाल तर आत्मविश्वासही कमी होतो. (How to use garlic to burn belly fat)कारण एकदा चरबी वाढली की कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. (Pot Kami Karnyache Upay in Marathi) काहीजण तर वजन कमी करण्यासाठी जेवण सुद्धा सोडातात. असं करण्यापेक्षा आहारात बदल करून तुम्ही सुटलेलं पोट लवकर कमी करू शकता. जेणेकरून पोटाची चरबी थुलथलीत दिसणार नाही आणि पोट आत जाईल. (How to Use Raw Garlic to Lose Weight)
प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात लसूण असतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. लसणाने मेटाबॉलिझ्म बूस्ट होतो आणि फॅट बर्न होण्यासही मदत होते. लसूण मोहोरीच्या तेलात कापून घाला नंतर व्यवस्थित भाजून घ्या. जेव्हा रंग बदलेल तेव्हा यात काळं मीठ घालून खा. तुम्ही मायक्रोव्हेव्हमध्येही लसूण भाजू शकता. (How to Lose Belly Fat With Garlic Water)
1) लसूण एक डिटॉक्सिफाईंग एजेंट आहे म्हणूनच लसणाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ युरीनच्या माध्यमातून बाहेर येण्यास मदत होते. यात फायबर्स भरपूर असतात. यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
2) लसूण एक नॅच्युरल एनर्जी बुस्टर आहे. यामुळे एस्ट्रा फॅट्सही कमी होतात. ज्यामुळे तुम्ही अधिकच फिट राहू शकता. लसूण मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत करतो.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर उपाय (Tips for weight loss)
रोज सकाळी १५ मिनिटं ब्रिक्स वॉक केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. तुम्ही रोज २५००० पाऊल चालल्यास अधिकाधिक फायदे होतील. हा वेट लॉस करण्याचा एक परफेक्ट उपाय आहे. जर तुम्हाला घरी वेळ मिळत नसेल तर ऑफिसमध्ये थोडावेळ चालण्याचा प्रयत्न करा.
आहारातून गोड पदार्थ वगळा. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन करू नका. कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करून आहारात प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा. अल्ट्राप्रोसेस्ड फूडचे जास्त सेवन करू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करू नका.