Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सब्जा आणि चिया सीड्समध्ये नेमका फरक काय? आहारतज्ज्ञ सांगतात, दोन्ही खाण्याचे फायदे आणि तोटे

सब्जा आणि चिया सीड्समध्ये नेमका फरक काय? आहारतज्ज्ञ सांगतात, दोन्ही खाण्याचे फायदे आणि तोटे

Benefits and Difference Between Sabja And Chia Seeds : सब्जा आणि चिया सीडस एकच असल्याचे म्हटले जाते, मात्र तसे नसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 01:07 PM2023-04-20T13:07:52+5:302023-04-20T14:29:19+5:30

Benefits and Difference Between Sabja And Chia Seeds : सब्जा आणि चिया सीडस एकच असल्याचे म्हटले जाते, मात्र तसे नसते.

Benefits and Difference Between Sabja And Chia Seeds : What exactly is the difference between Sabja and Chia seeds? Nutritionists say, the benefits of both... | सब्जा आणि चिया सीड्समध्ये नेमका फरक काय? आहारतज्ज्ञ सांगतात, दोन्ही खाण्याचे फायदे आणि तोटे

सब्जा आणि चिया सीड्समध्ये नेमका फरक काय? आहारतज्ज्ञ सांगतात, दोन्ही खाण्याचे फायदे आणि तोटे

सुकेशा सातवळेकर 

डाएट हे आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. मात्र सध्या डाएट हे एकप्रकारचे फॅड झाले असून कोणाचे ऐकून किंवा इंटरनेटवर सर्च करुन काही जणी बारीक होण्यासाठी मनानेच डाएट करतात. मग यामध्ये कमी खाणे, बराच काळ उपाशी राहणे, फक्त सॅलेड किंवा फळंच खाणे यांसारखे प्रयोग केले जातात. असे करणे ठिक असले तरी त्यासाठी आहारतज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्यायला हवा. नाहीतर वजन कमी करायचे म्हणून डाएट करता करता शरीराचे पोषण बाजूला राहते. अशावेळी शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स मिळाली नाहीत तर आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अनेकदा सब्जा आणि चिया सीडस एकच असल्याचे म्हटले जाते. मात्र या दोन्हीमध्ये बराच फरक असून त्याचे शरीराला होणारे फायदेही वेगवेगळे आहेत (Benefits and Difference Between Sabja And Chia Seeds). 

१. सब्जाच्या बिया पूर्ण काळ्या रंगाच्या असतात. चिया सीडस मात्र थोड्या करड्या, पांढरट काळ्या, ब्राऊनिश अशा रंगाच्या असतात. हा या दोन्हीच्या दिसण्यातील मुख्य फरक आहे. तसंच चिया सीडस आकाराने थोडे मोठे असतात तर सब्जा तुलनेने जास्त बारीक असतो. 

सब्जा
सब्जा

२. सब्जा सिडस भारतात आणि इतर काही देशांत पिकतात. पण चिया सिडस या मेक्सिकन असून त्या भारतात आयात केल्या जातात. चिया सीडस कच्च्या किंवा पाण्यात भिजवून वापरता येतात. पण सब्जा मात्र पाण्यात भिजवूनच वापराव्या लागतात. 

३. सब्जा पाण्यात टाकल्यावर फुगतो आणि त्याच्या बाजुने एक पारदर्शक कोट तयार होतो. पण चिया सिडस मात्र पाण्यात भिजवल्यावर १० पट पाणी शोषतात, पण त्यांना भिजायला खूप वेळ लागतो. 

४. चिया सीडसला स्वत:ची अशी चव नसते. त्यामुळे कोणत्याही पदार्थात त्या घातल्या तरी पदार्थाची चव बदलत नाही. सब्जाला तुळशीचा एक सौम्य वास आणि चव असते. ज्या पदार्थात सब्जा घालू त्याला त्याचा एकप्रकारचा वास येतो. 

५. दोन्ही सिडस अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्या आणि जेवणाच्या आधी घेतल्या तर त्यातील फायबरमुळे पोट भरल्याचा फिल येतो आणि कमी खाल्ले जाते त्यामुळे वजन कमी करायला मदत होते. 

चिया सीडस
चिया सीडस

६. चिया सीडसवर आतापर्यंत बरेच संशोधन झाले असून वजन कमी करायला त्याची मदत होते हे सिद्ध झाले आहे. सब्जावर मात्र अजून तितके संशोधन झालेले नाही. चिया सीडसमुळे एनर्जी, स्टॅमिना वाढण्यास मदत होते. चिया सीडसमध्ये प्रोटीन, ओमेगा ३ आणि चांगले फॅटसही बऱ्याच प्रमाणात असतात. 

७. सब्जाचा मुख्य फायदा म्हणजे पोटाला थंडावा मिळण्यासाठी याचा उपयोग होतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून सब्जा खाल्ला जातो. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. डीटॉक्सिफिकेशनसाठी याचा उपयोग होत असल्याने त्वचा, केसांसाठी हे फायदेशीर असतात. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठीही सब्जा फायदेशीर ठरतो. 

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)

Web Title: Benefits and Difference Between Sabja And Chia Seeds : What exactly is the difference between Sabja and Chia seeds? Nutritionists say, the benefits of both...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.