Join us  

आजारांपासून बचावासाठी 'या' प्रकारच्या भाकऱ्यांचे करा सेवन; इम्यूनिटी वाढवण्याचा स्वस्त, सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 2:51 PM

Benefits of baajara : आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतील. तुम्हाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या.

ठळक मुद्देअनेकजण बाजरीची भाकरी बनवून खातात. पण तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर बाजरी भिजवून त्याची खिचडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता.

भारतीय आहारात पूर्वीपासूनच भाकरीचे फार महत्व आहे. आता कोरोनाकाळात पुन्हा एकदा ज्वारी, बाजरीच्या भाकरी चर्चेत आल्या आहेत.  सगळ्यांनाच गरम गरम भाज्यांसह किंवा मासे, चिकनसह भाकरी  खायला आवडते. फक्त  तांदळाच्या नाही तर ज्वारी आणि बाजरी या धान्यांचाही आहारात समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला इम्यूनिटी वाढवण्यासाठी भाकरीचं सेवन कसं फायदेशीर ठरतं यााबाबत सांगणार आहोत. 

कोरोनाच्या माहामारीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा ज्वारी, बाजरीच्या भाकरीनं लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात फायरबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्स, थायमिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांमुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. इम्यूनिटी बुस्टरच्या रुपात हे ओळखलं जातं. 

पोषणतज्ञ बाजरीला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. कारण ते खूप पौष्टिक आणि ग्लूटेन फ्री आहे. कमी ग्लाइसेमिक इंडेक्समुळे, हे धान्य रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवत नाही. तज्ञांच्या मते, बाजरी हा आपल्या दैनंदिन आहाराचा आवश्यक भाग असावा.हे केवळ टाइप 2 डायबिटीस असलेल्यांसाठी फायदेशीर ठरत नाही तर रक्तदाब कमी करण्यास देखील प्रभावी आहे. बद्धकोष्ठता, गॅस, सूज येणे यासारख्या गॅस्ट्रिक अल्सर सारखी पोटाविषयक आजारांचा धोका कमी होतो. पोट साफ न होण्याची  समस्या या भाकरीच्या सेवनाने दूर होते. 

बाजरीत डाएटरी फायबर्स आणि पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. प्रोटीन्स, सुक्ष्म पोषक तत्व आणि फायटोकेमिकल्सही असतात. बाजरीत २००  कॅलरी आणि ७ ते १२ टक्के म्हणजेच ६ ग्राम प्रोटीन्स, १.७ ग्राम फॅट, ४० ग्राम कार्बोहायड्रेट्स आणि २ ग्राम फायबर्स असतात.  बाजरीतील प्रोटीन आणि कार्ब्स एक प्रमुख स्त्रोत आहे.  हे ग्लुटेन फ्री असून सेलियाक रोग असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

बाजरीचे सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. उर्जेचं एक चांगले स्त्रोत आहे. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते. सामान्य रक्तदाब हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.  पोषक- समृद्ध बाजरीच्या उत्पादनांमध्ये गुंतलेल्या कृषी-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 2018 ला 'राष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून साजरे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते पौष्टिक आहार व चांगले आरोग्य निर्माण करण्यासाठी भारताने बाजरी क्रांतीवर काम करण्याची गरज आहे.  बाजरीचा वापर आणि उत्पादन वाढविणे हे यामागील उद्दीष्ट आहे.

हाडं चांगली राहतात

नियमित बाजरीचं सेवन केल्यानंतर शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही तर  कोरोनाशी लढण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. 

सर्दी, खोकला टाळता येऊ शकतो

आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतील. तुम्हाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. सकाळी नाश्त्याला गूळ किंवा साखर घालून बाजरीचा घाटा तयार करून तुम्ही नियमित प्यायल्यास ही समस्या दूर होते. 

बाजरी खाण्याची योग्य पद्धत

अनेकजण बाजरीची भाकरी बनवून खातात. पण तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर बाजरी भिजवून त्याची खिचडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. HealthifyMe calorie counter नुसार एका बाजरीच्या भाकरीत ९७ कॅलरीज असतात. बराचवेळ भूक लागू नये यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. पण गरजेपेक्षा जास्त सेवन करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं बाजरीचे सेवन करावे. 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्या