वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि इतरही अनेक आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दररोज लवंग खाणे अत्यंत गरजेचे आहे. लवंग खाण्याचे प्रमाण खूपही असून चालत नाही. दररोज २ लवंगा एवढे प्रमाण आरोग्यासाठी अगदी पुरेसे आहे. लवंगेत फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारणे, मेंदूचे कार्य सुरळीत करणे यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंगेमध्ये मँगनीज मोठ्या प्रमाणावर असते. हाडांच्या मजबुतीसाठी मँगनीज अत्यंत आवश्यक आहे.
लवंग कसे खावे ?
- सकाळच्या वेळी दोन लवंगा खाणे कधीही चांगले. दुपारी आणि रात्री जेवणानंतर एकेक लवंग खाल्ली तरी पचनास उपयुक्त ठरते.
- याशिवाय चहामध्ये लवंगाची पावडर घालता येते. लवंगाचा काढा बनविणे किंवा भाजीत लवंग पावडर घालणेही उपयुक्त ठरते.
लवंग खाण्याचे फायदे
- लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस, जुनाट सर्दी आणि दातदुखीसाठी फायदेशीर ठरते.
- लवंग खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, घसा दुखणे असे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीही लवंग उपयुक्त ठरते.
- लवंगमध्ये ॲण्टी बॅक्टेरिअल आणि ॲण्टी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे सहजासहजी काेणताही संसर्गजन्य आजार होऊ शकत नाही.
- शरिरातील टॉक्सिक बाहेर टाकण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते.
- छातीत जळजळ होऊन पित्ताचा त्रास होत असल्यास लवंग चघळणे फायदेशीर ठरते.
- लवंगमध्ये असणारे ॲण्टी-ऑक्सिडंट्स रक्तातील ग्लूकोज नियंत्रित करतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनीही नियमितपणे लवंग खावी.
- लवंग खाल्ल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. यामुळे वजन नियंत्रित राहते. फॅट बर्नसाठीही लवंग उपयुक्त ठरते.