महाराष्ट्रात ग्रामीण भागात सर्वाधिक आवडीनं खाल्लं जाणारं अन्न म्हणजे पिठलं, भाकरी, ठेचा आणि कांदा. त्यातही ज्वारीची भाकरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वाधिक खाल्ली जाते. आता हिवाळ्याच्या दिवसात ज्वारीची भाकरी थोडीशी बाजूला ठेवा आणि तिची जागा बाजरीच्या भाकरीला घेऊ द्या. कारण थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं (Benefits of eating Bajari bhakari in marathi) मानलं जातं. बाजरी ही शक्तीवर्धक मानली जाते. त्यामुळे दिवसभर उर्जा (bajari gives energy) टिकवून ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, कॅलरीज, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह हे खूप जास्त प्रमाणात असतं.
बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे (Benefits of eating Bajari in Marathi)
१. हिवाळ्यातलं सर्वोत्तम डाएट
healthy food for winter
बाजरीची भाकरी उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात ती आवर्जून खाल्लीच पाहिजे. शरीरात उष्णता टिकून रहावी म्हणून आपण हिवाळ्यात डिंकाचे, मेथीचे, उडीदाचे लाडू खात असतो. बाजरीची भाकरी देखील अगदी याच तोडीची आहे. बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच भरपूर उर्जाही देते. बाजरीच्या भाकरीसोबत पिठलं, ठेचा याऐवजी गुळ, तुप, दूध हे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे. त्याने आरोग्याला अधिक फायदा होतो.
२. वजन घटविण्यासाठी सर्वोत्तम
Effective for weight loss
बाजरी हे एक लो कॅलरी डाएट मानले जाते. त्यामुळे भाकरी खाल्ल्यानंतर वजन वाढायचं अजिबातच टेन्शन नाही. म्हणूनच जे लोक वजन घटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी हिवाळ्यात बाजरीची भाकरी निममितपणे खावी. हिवाळ्यात आपली भूक वाढते. भूक लागल्यावर सारखं काहीतरी तोंडात टाकलं जातं. म्हणूनच हिवाळ्यानंतर अनेकांची तब्येत सुधारलेली दिसून येते. म्हणूनच जर भुकही भागवायची असेल आणि वजनही वाढू द्यायचं नसेल तर हिवाळ्यात बाजरीची भाकरी खा.
३. कोलेस्टरॉल राहते नियंत्रणात
Cholesterol control
बाजरीमध्ये असणारे गुणधर्म आणि काही पौष्टिक घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. बाजरीच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोलेस्टरॉल नियंत्रणात राहिल्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
४. हाडांसाठी उपयुक्त
Beneficial for bones
बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी बाजरी खाणे अतिशय फायदेशीर ठरते. हिवाळ्यात अनेकांचे संधीवाताचे दुखणे उफाळून येते. अशा व्यक्तींनीही थंडीमध्ये नियमित बाजरी खाल्ली तर त्यांचा त्रास कमी हेाऊ शकतो. बाळ झाल्यानंतर ज्या महिलांना दूध कमी येते, त्यांनाही डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाजरीचे विविध पदार्थ दिले जातात. शिवाय अशा महिलांची बाळंतपणात झालेली शारिरीक हानी भरून येण्यासाठीही बाजरी उपयुक्त ठरते.