Join us  

बोरं खा बोरं; महागडी फळं खाता आणि बोरांना नाही म्हणता, मग विसरा ग्लोइंग स्किन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 12:20 PM

Healthy fruits: आंबट- चिंबट म्हणून बाेरं खाणं टाळताय... असं करू नका.. कारण इवल्याशा बोरांमध्ये काय काय ब्यूटी सिक्रेट्स (beauty secrets in ber) दडले आहेत, ते आपल्याला माहितीच नाहीत..

ठळक मुद्देहिवाळ्याच्या दिवसात डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. तसेच त्वचा देखील निस्तेज, डल दिसू लागते. हे सगळं जर थांबवायचं असेल, तर कोणत्याही ब्यूटी प्रोडक्टपेक्षा बोरं खाणं अधिक फायद्याचं ठरतं.

डिसेंबर- जानेवारी या महिन्यात बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोरं दिसून येतात. केशरी, नारंगी, हिरवी, पोपटी रंगाची अशी अनेक प्रकारची बोरं आपण बाजारात पाहतो. रंग जसा बदलतो तशी त्यांची चव देखील बदलते. कोणी केशरी, नारंगी रंगाच्या बिलबिलीत असलेल्या आणि चवीला आंबट लागणाऱ्या गावरान बोरांचा (fruit jujube) चाहता असतो तर कुणाला गोड चवीची मोठी टपोरी बोरं आवडतात. चवीने बोरं (benefits of eating ber or jujube in Marathi) खाणारी जेवढी मंडळी आहेत, तेवढीच बोरं न खाणारेही अनेक जण आहेत.

 

बोरं आंबट असतात. त्यामुळे बोरं खाल्ले तर खोकला येईल, एवढीशी बोरं निवडून निवडून खावी लागतात, आत आळी आहे का किड लागली आहे का, हे तपासावे लागते. त्यामुळे मग अनेक जणांना बोरं खाण्याचाही कंटाळा येतो. कारण बोरं खाणं म्हणजे वेळखाऊ काम आहे, असं त्यांना वाटतं... पण अशा कोणत्याही छोट्या - छोट्या कारणावरून बोरं खाणं टाळू नका. कारण वर्षभरातून अवघे दिड ते दोन महिनेच हे फळ आपल्या वाट्याला येतं. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक हंगामी फळ खाल्लंच पाहिजे. 

 

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लालचुटूक बोरांचा एक फोटो शेअर केला असून बोरं खाण्याचे फायदे सांगितले आहेत. हिवाळ्याच्या दिवसात डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. तसेच त्वचा देखील निस्तेज, डल दिसू लागते. हे सगळं जर थांबवायचं असेल, तर कोणत्याही ब्यूटी प्रोडक्टपेक्षा बोरं खाणं अधिक फायद्याचं ठरतं. lethal for dandruff and the secret behind glowing skin..... अशा शब्दांत ऋजुता दिवेकर यांनी बोरांमध्ये दडलेले ब्यूटी सिक्रेट्स समजावून सांगितले आहेत. 

 

बोरं खाण्याचे फायदे ( Benefits of eating ber)- संत्री, मोसंबी या फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी (vitamin c) असतं हे आपल्याला माहिती आहे. पण या फळांपेक्षा बोरांमध्ये व्हिटॅमिन सी ची मात्र खूप अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (immunity booster) वाढविण्यासाठी बाेरं खाणं खूप फायद्याचं मानलं जातं.- काही मुलं वारंवार आजारी पडतात. अशा मुलांना बाेरांचा हंगाम असेल तेव्हा भरपूर प्रमाणात बोरं खायला द्यावीत. बोरांमधली ही उर्जा त्यांना वर्षभर पुरते.- बोरामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज (low calories) असतात. पण त्यातून खूप जास्त उर्जा मिळते. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांनाही बोरे चालतात. - व्हिटॅमिन्स ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे देखील चांगले प्रमाण बोरांमध्ये असते.- बोरांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स (anti oxidants) असतात. त्यामुळे बोरं खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

- बोरं हे एक उत्तम ॲण्टीएजिंग (anti aging) घटक आहे. भरपूर प्रमाणात बोरं खाल्ल्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं रोखलं जातं.- बोरं खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींनाही बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो.- बोरांमुळे पचनशक्ती सुधारते (improves digestion) आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नत्वचेची काळजीकेसांची काळजी