Join us  

दालचिनीचा छोटासा तुकडा पावसाळ्यात रोज का खावा? बघा तरी मध दालचिनी खावून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 1:24 PM

दालचिनी हा भारतीय मसाल्यांमधला एक महत्त्वाचा घटक. पण तरीही बऱ्याचदा दालचिनी म्हणजेच Cinnamon चा वापर भाज्या किंवा चहा मसाला वगळता अन्य ठिकाणी फार होताना  दिसत नाही. दालचिनी आरोग्यवर्धक असून पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरते. 

ठळक मुद्देदालचिनीचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. पण म्हणून ती भरपूर प्रमाणात खाण्याची चूक मुळीच करून नका.

दालचिनी हा अत्यंत सुगंधी पदार्थ आहे. त्यामुळे भाज्या किंवा चहामध्ये दालचिनी घातली, की छान सुगंध तर येतोच पण पदार्थ अधिक चवदार होतो. पावसाळ्यात  संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूपच  वाढलेले असते.  त्यामुळे पावसाळ्यात आवर्जून दालचिनी खावी. कारण दालचिनी जीवाणू आणि बुरशीजन्य  आजारांचे  संक्रमण रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. दालचिनीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही दालचिनीचे सेवन दररोज योग्य प्रमाणात केले पाहिजे. यासोबतच दालचिनीमध्ये सोडियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. 

 

दालचिनी खाण्याचे फायदे१. दालचिनीमध्ये अँटिऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे सौंदर्याच्या दृष्टीनेही दालचिनीचे नियमित सेवन करणे खूप उपयुक्त ठरते. दालचिनीचे सेवन दररोज केले तर चेहऱ्यावर वयाच्या खाणाखूणा चटकन दिसत नाहीत.२. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही दालचिनी उपयोगी असते. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज दालचिनीचे सेवन केले पाहिजे. ३. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते.

४. मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठीही दालचिनी खाण्याचा सल्ला दिला जातो. ५. यकृताच्या समस्या व मुत्ररोग असे आजाराही दालचिनी खाल्ल्याने कमी होतात. ६. अपचनासंबंधीच्या विविध तक्रारी दूर करण्यासाठी दालचिनी खावी. दालचिनी, सुंठ, जीरे आणि विलायची हे सगळे समप्रमाणात घेऊन त्यांची भुकटी करावी. ही भुकटी गरम पाण्यासोबत प्यावी. यामुळे पचनाच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. 

७. सर्दी आणि तत्सम अनेक आजारांसाठीही दालचिनी खाल्ल्याने फायदा होतो. सर्दी, खोकला, घसादुखी अशा समस्या असल्यास दालचिनी, ज्येष्ठमध आणि मधाचे चाटण करून द्यावे. लगेच फायदा दिसून येतो.८. डोकेदुखी, ॲसिडीटी दालचिनी खाल्ल्याने कमी होते.९. मुखदुर्गंधी आणि दातदुखीसाठी दालचिनी उपयुक्त ठरते. 

 

स्त्रिरोगही होतात दूर१. अंगावरून पांढरे पाणी जाणे, गर्भाशयाचे विकार या आजारांवरही दालचिनी उपयुक्त ठरते.२. बाळांतिनीला दूध कमी येत असेल, तरी दालचिनीच्या सेवनाने दूध वाढते.

सौंदर्यातही दालचिनीचा उपयोगदालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असल्याने दालचिनीचा उपयोग सौंदर्यासाठी तर दालचिनी उपयुक्त ठरतेच. पण चेहऱ्यावर मुरूम येत असतील तर दालचिनी आणि लिंबाचा रस एकत्र करून बनविलेला लेप फोडांवर लावावा.

 

दालचिनीचा अतिरेक नकोदालचिनीचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. पण म्हणून ती भरपूर प्रमाणात खाण्याची चूक मुळीच करून नका. कारण दालचिनी खूप जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दालचिनी हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे जर योग्य प्रमाणात दालचिनी खाल्ली गेली नाही, तर यकृत किंवा किडनीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे दिवसभरातून एखादा चिमुटभर एवढ्या प्रमाणातच दालचिनी खावी. 

 

दालचिनीचे पाणी पिणे फायद्याचेरात्री तांब्यांच्या भांड्यात पाणी टाकून त्यात एक चिमुटभर दालचिनीची पावडर टाकावी. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. चवीसाठी त्यात लिंबू पिळले आणि मध टाकला तरी चालते. हे पाणी दररोज घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अनेक जुनाट आजारही दूर होतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नमानसून स्पेशल