Join us  

अभिनेत्री भाग्यश्री म्हणते गैरसमज टाळा; काजू खाण्याचे फायदे पाहा! मिळवा सुंदर त्वचा, काळेभोर केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 2:38 PM

Benefits of eating cashews: इतर कोणत्याही ड्रायफ्रुट्सबद्दल (dry fruits) नसतील, एवढे गैरसमज काजूबद्दल आहेत. त्यामुळे काजू खाणं टाळत असाल, तर असं करू नका, कारण त्वचा आणि केसांसाठी (skin and hair care) काजू बेस्ट आहेत, असं सांगतेय दस्तुरखुद्द अभिनेत्री भाग्यश्री... बघा तरी तिचं काजूबद्दल नेमकं काय मत आहे..

ठळक मुद्देकाजूमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेला चमक देतात आणि ॲण्टी एजिंग एजंट म्हणून फायदेशीर ठरतात.काजूमध्ये असणारे फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. पण यासाठी दररोज केवळ ३ ते ४ काजू खावेत. यापेक्षा जास्त नको.

'मैने प्यार किया' फेम मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree) ही आता चित्रपटांमधून दिसत नसली तरी सोशल मिडियावर मात्र बरीच ॲक्टीव्ह झाली आहे. तिचे काही व्हिडियोज, फोटो ती इन्स्टाग्रामवर (instagram), सोशल मिडियावर नेहमीच शेअर करत असते. सध्या ती विशाखापट्टणम येथे गेली असून तिथूनच तिने तिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये भाग्यश्रीने विशाखा पट्टणम (Vishakha pattanam) येथील सौंदर्याची, तिथल्या बिचेसची थोडी फार माहिती सांगितलीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडियोच्या माध्यमातून तिने काजूविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

भाग्यश्रीचे इन्स्टाग्रामवर #tuesdaytipswithB हे एक पेज आहे. यावर ती दर मंगळवारी एक ब्यूटी, हेल्थ टिप शेअर करत असते. सध्या तिने जो व्हिडियो शेअर केला आहे, तो काजूंबाबत आहे. ती म्हणजे की काजू आणि बदाम यांची स्पर्धा केली तर नेहमीच बदाम जिंकतात. कारण काजु सगळ्यांना आवडत असले तरी त्यांच्याविषयी असलेल्या गैरसमजांमुळे अनेक जण काजू खाणं टाळतात. भाग्यश्री म्हणते की काजूमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम असे अनेक घटक असून ते आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय  उपयुक्त आहेत. त्यामुळे दररोज ४ ते ५ काजू आपण खाऊ शकतो, असं डॉक्टरही सांगतात. म्हणूनच तर आता भाग्यश्रीचं ऐकु आणि केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी काजू खाऊन बघू. 

 

काजू खाण्याचे फायदेBenefits of eating kaju or cashews in marathi- काजूमध्ये कार्बोहायड्रेट्स, शुगर, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, प्रोटिन्स, झिंक,  व्हिटॅमिन सी आणि बी हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे काजू तब्येतीसाठी पौष्टिक आहेत.- काजूमध्ये असणारे फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. पण यासाठी दररोज केवळ ३ ते ४ काजू खावेत. यापेक्षा जास्त नको.- शरीरातील वाईट कोलेस्टरॉल (bad cholesterol) नियंत्रित ठेवण्यासाठी काजू मदत करतात.- काजूमध्ये फायबर (fiber) मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनशक्ती (digestion) सुधारण्यासाठी काजू उपयुक्त ठरतात. - काजूमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे काजू खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरातली उर्जा टिकवून ठेवते. त्यामुळे वेटलॉससाठीही (weight loss) योग्य प्रमाणात केलेले काजूचे सेवन उपयुक्त आहे. 

- काजूमध्ये असणारे प्रोटिन्स (proteins) त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरतात. - काजूमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स (anti oxidants) त्वचेला चमक देतात आणि ॲण्टी एजिंग (anti aging) एजंट म्हणून फायदेशीर ठरतात.- काजूमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे मेंदूसाठी ते उपयुक्त ठरते. म्हणून लहान मुलांना काजू अवश्य द्यावेत. - काजूमध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड (omega 3 fatty acid), व्हिटॅमिन ई हे केस, त्वचेप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.- मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी नियमितपणे काजू खावेत.- काजूमध्ये असणारे कॅल्शियम (calcium) हाडांना मजबूती देणारे आहे- काजूचे नियमित आणि योग्य प्रमाणात केलेले सेवन थायरॉईड (thyroid) नियंत्रणात ठेवते. 

 

हे देखील लक्षात घ्या... काजू जर खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामध्ये असणाऱ्या भरपूर कॅलरीजमुळे वजन वाढण्याचा त्रास होऊ शकतो. काजूमुळे शरीरातली उष्णता देखील वाढते. काजू खूपच जास्त खाल्ले तर बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे काजूचे अतिसेवन टाळावे. ३ ते ४ काजू एका दिवसात खायला काही हरकत नाही.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सभाग्यश्रीअन्न