Join us  

तुम्हीही पोळी, फुलक्यावर तूप लावून खाता? हे आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 12:19 PM

Benefits of Applying Ghee on Chapati Diet Tips : तूप लावलेली पोळी किंवा फुलका खाणे आरोग्यासाठी चांगले असते का, हे तूप किती प्रमाणात लावायला हवे याविषयी

ठळक मुद्देकोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते अन्यथा ती घातक ठरु शकते. पोळीला तूप लावून खाणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर असते याविषयी...

थंडीच्या दिवसांत पोळी किंवा फुलका सकाळी केला की दुपारपर्यंत अगदी गार होऊन जातो. गार किंवा कोरडी झालेली पोळी आपल्याला डब्यात खाल्ली जात नाही. अशावेळी ही पोळी मऊ राहावी यासाठी आपण पोळीला किंवा फुलक्याला भरपूर तूप लावतो. तेल लावण्यापेक्षा तूप आरोग्यासाठी चांगले म्हणून नियमितपणे पोळीला तूप लावून खाणारे आपल्या आजुबाजूला बरेच जण असतात. थंडीच्या दिवसांत तर तुपामुळे शरीरातील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे तूप लावलेली पोळी आवर्जून खाल्ली जाते. आता अशाप्रकारे तूप लावलेली पोळी किंवा फुलका खाणे आरोग्यासाठी चांगले असते का, हे तूप किती प्रमाणात लावायला हवे याविषयी मात्र आपण फारसा विचार केलेला नसतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आचल सोगानी या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट शेअर केली असून त्याद्वारे त्या काय सांगतात पाहूया (Benefits of Applying Ghee on Chapati Diet Tips)...

(Image : Google)

१. वजन कमी करायचे म्हणून अनेक जण तूप खाणे पूर्णपणे बंद करतात मात्र असे करणे योग्य नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतही तूप अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.     

२. पोळी गव्हापासून बनलेली असल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. एखाद्या पदार्थामध्ये किती कार्बोहायड्रेटस आहेत हे मोजण्याचे प्रमाण म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी किती पटकन वाढते हेही यामुळे समजते. हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हावा यासाठी तूप अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. 

३. पोळीला तूप लावले असेल तर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि मग तुम्ही एकाद जेवण झाले की दिवसभर इतर फॅटी फूड जास्त खात नाही. 

४. तूपामध्ये चरबी विरघळवणारी काही जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारात आवर्जून तुपाचा समावेश करायला हवा. 

(Image : Google)

५. तुपामध्ये असलेल्या उष्मांकामुळे फ्री रॅडीकल्सपासून मुक्ती होते आणि पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी त्याची मदत होते. 

६. आता हे सगळे ठिक असले तरी किती तूप खायला हवे याबाबतही अनेकांना प्रश्न असतो. आवडते म्हणून खूप जास्त तूप खाणे योग्य नाही, तर १ लहान चमचा तूप एका पोळीसाठी किंवा फुलक्यासाठी पुरेसे असते. कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते अन्यथा ती घातक ठरु शकते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजना