Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी

वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी

Benefits Of Eating Coconut For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी नारळ खाण्याची ही भन्नाट युक्ती तुम्हाला माहिती आहे का? (how to do weight loss by eating coconut?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 06:16 PM2024-11-08T18:16:44+5:302024-11-08T18:17:29+5:30

Benefits Of Eating Coconut For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी नारळ खाण्याची ही भन्नाट युक्ती तुम्हाला माहिती आहे का? (how to do weight loss by eating coconut?)

benefits of coconut for weight loss, simple and easy weight loss tips, how to do weight loss by eating coconut? | वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी

वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी

Highlightsनारळाच्या तेलात जे मिडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कारण त्यामुळे शरीरात फॅट्स साचून राहण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. 

वाढतं वजन कमी कसं करायचं? हा प्रश्न हल्ली बहुतांश लोकांना छळत असतो. अगदी प्रत्येक घरात बीपी, शुगर, हृदयविकार असे त्रास असणारा एक तरी व्यक्ती असतोच, तसंच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारा कोणी ना कोणी हमखास भेटतोच.. वाढलेलं वजन झटपट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर एकदा हा नारळाचा उपाय जरूर करून पाहा (benefits of eating coconut for weight loss). कारण जर तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने नारळ खाल्लं तर त्याचा परिणाम नक्कीच अंगावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी होऊ शकतो, असं नुकतंच एका अभ्यासात समोर आलं आहे.(how to do weight loss by eating coconut?)

 

वजन कमी करण्यासाठी नारळ फायदेशीर ठरते का?

वजन कमी करण्यासाठी नारळ नेमकं कशा पद्धतीने आहारातून घ्यावं, याविषयी Food and Function या जर्नलमध्ये मांडण्यात आलेला अभ्यास हेल्थशॉट यांनी प्रसिद्ध केला आहे. 

भाकरी नेहमीच खाता, आता बाजरीच्या पिठाचे आप्पे करून पाहा; लहान मुलंही मिटक्या मारत खातील

१. अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की अन्न शिजविण्यासाठी नारळाचं तेल वापरा. कारण त्याचा स्मोकिंग पॉईंट खूप जास्त असल्याने ते अन्न शिजविण्यासाठी इतर तेलांपेक्षा उत्तम आहे. याशिवाय सकाळी कॉफीमध्ये एक चमचा नारळाचं तेल टाकून प्यायल्यानेही पचनक्रिया, चयापचय क्रिया चांगली होते. नारळाच्या तेलात जे मिडियम चेन ट्रायग्लिसराईड असतात ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कारण त्यामुळे शरीरात फॅट्स साचून राहण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. 

२. नारळाचं दूध प्या. कारण त्यामुळे शरीराला अनेक हेल्दी फॅट आणि फायबर मिळतात.

 

३. व्यायाम केल्यानंतर नारळपाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहून वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

तेल- शाम्पू बदलण्यापेक्षा 'हा' उपाय करा, केस गळणं कायमचं थांबेल- भराभर वाढून दाट होतील 

४. दोन जेवणांच्यामध्ये बऱ्याचदा थोडीशी भूक लागते. अशी छोटीशी भूक भागविण्यासाठी नारळ किंवा खोबरं खाणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 

वजन कमी करण्यासाठी नारळ आणि नारळाचे वेगवेगळे पदार्थ खाणे उपयुक्त ठरत असले तरी त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. कारण अतिप्रमाणात नारळ खाल्ल्यामुळे काही लोकांच्या शरीरात LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. तसेच नारळाचे तेल अतिप्रमाणात खाल्ल्याने अनेकांना डायरियाचा त्रासही होऊ शकतो. 

 

Web Title: benefits of coconut for weight loss, simple and easy weight loss tips, how to do weight loss by eating coconut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.