दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करावी असं तुम्ही नेहमीच ऐकत आला असाल. कारण कोमट पाण्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Benefits of Consuming Ghee with warm water) पोट साफ होत नसेल किंवा वजन जास्त वाढलं असेल तर गरम पाणी प्यायल्याने पोट डिटॉक्स होण्यासही मदत होते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक मध आणि लिंबू मिसळून गरम पाणी पितात तर काहीजण रात्री भिजवून ठेवलेल्या धण्यांचे किंवा बडिशेपेचे पाणी पितात. गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. (Ghee With Luke Warm Water Benefits in Marathi)
१) सकाळच्यावेळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने हाडं मजबूत राहतात. इतकंच नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासही मदत होते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि सांधेदुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. चेहऱ्यावर मॉईश्चर टिकून राहते.
२) कोमट पाण्यात तूप घालून प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठीही हे पाणी उत्तम मानले जाते. रिकाम्या पोटी पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शुगर लेव्हल चांगली राहते आणि वजनही नियंत्रणात राहतं. तुपात अनेक पोषक तत्व असतात.
३) ओमेगा-३, फॅटी एसिड्, व्हिटामीन ए, के, ई, याव्यतिरिक्त तूपात व्हिटामीन ए, सी ब्युटीरिक एसिड असते. या तत्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी
४) अनेकदा छोटं आणि मोठं आतडे कोरडे पडते. अशावेळी खाद्यपदार्थ पचवणं कठीण होतं. अशावेळी गरम पाण्याबरोबर एक चमचा तूप घेतल्याने डायजेटिव्ह ट्रॅक लुब्रिकेंट होते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
५) तूपातील मॉईश्चरायजिंग गुणधर्म त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शरीराच्या आतील आणि बाहेरील त्वचा सुधारण्यासाठी हे महत्वाचे असते. यामुळे आतडे पूर्णपणे स्वच्छ होतात आणि पचनक्रिया संतुलित राहते आणि शरीरात टॉक्सिन्स जमा होत नाहीत.
केस धुतले की गळून गळून घरभर पसरतात? आठवड्यातून एकदा 'हा' मास्क लावा, दाट होतील केस
६) नियमित कोमट पाण्यात १ चमचा तूप मिसळून प्यायल्याने संक्रमणापासून बचाव होतो. नाक, कान, गळा आणि छातीचे इन्फेक्शन होत नाही. रिकाम्या पोटी तूपाचे सेवन केल्यानं शरीराला हिट मिळते. फिव्हर, कॉमन कोल्ड यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.