भारतातील सर्वाधिक लोकांना ऑयली फुड्स, स्विट डिशेज खायला खूप आवडते. (Weight Loss Tips) कारण येथिल लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं खूपच कठीण होतं. (Best Drink For Weight Loss) रोजच्या कामाच्या गडबडीत कोणालाही इतका वेळ नसतो की लोक कामातून वेळ काढून जिमला जातील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचा रोजच्या रूटीनमध्ये समावेश करू शकता. ज्यामुळे फार काही न करता तुमचं वजन सहज कमी होईल. (Ajwain Water Is Good For Weight Loss According To Research)
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिन्सच्या रिपोर्टनुसार एका संशोधनात जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये आठ आठवडे जीरं खाण्यास सांगितले होते. यात जीऱ्यामुळे मेटाबॉलिझ्मवर सकारात्मक परिणाम दिसून आला. वजन आणि मेटाबॉलिझ्म, जीऱ्याच्या सेवनानेचा परिणाम यात पाहण्यात आला. जीऱ्याचं पाणी ही सर्वात सोपी युक्ती आहे.
वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी उत्तम उपाय आहे. हा आयुर्वेदीक उपाय असून औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. भारतातील प्रसिद्ध आहारातज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले की, ओव्याचं पाणी प्यायल्याने पोट तसंच कंबरेची चरबी कमी होण्यासही मदत होते. ओव्याचा रोजच्या आहारात कसा समावेश करावा ते समजून घेऊ.
ओव्याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way To Drink Ajwain Water)
एक लिटर पाणी घेऊन ते उकळून घ्या. पाणी सोनेरी झाल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. ज्यामुळे वजनावर परिणाम दिसून येईल आणि तुम्ही मेंटेन राहाल. ओव्याच्या पाण्याने पचनक्रियेवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो.
ओव्याच्या पाण्याचा वापर कसा करावा? (How to use Ajwain Water For Weight Loss)
जर तुम्ही सकाळी काहीही न खाता ओव्याचं पाणी प्यायलात तर वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल आणि बेली फॅट कमी होईल. ओव्याचं पाणी हलकं गरम करून पिऊ शकता. ज्यामुळे चांगला परिणाम दिसून येईल. रोजच्या आहारातील ओव्याचे प्रमाण वाढवा. भाजी, सूप, ताकात तुम्ही जिरं घालून खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी २५ ग्राम ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवण्यासाठी ठेववा. दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
जर एक महिना तुम्ही ओव्याचे पाणी प्यायलात तर शरीरात आपोआप फरक दिसून येईल. रात्रीच्यावेळी ओव्याचं पाणी भिजवायला विसरू नका. सकाळच्यावेळी एक ग्लास पाण्यात १ चमचा ओवा घालून एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा. त्यात ५ ते ६ तुळशीची पानं घालून उकळवत राहा. शेवटी गॅस बंद करा आणि कोमट झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.