Join us  

बघा चहा पिऊन वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय! चरबी उतरेल झरझर- एकदम सडपातळ व्हाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2024 10:21 AM

Weight Loss Tips: चहा पिऊन वजन कमी होतं असं कोणी म्हणत असेल तर तो उपाय नेमका कोणता हे एकदा बघायलाच हवं नाही का? (benefits of drinking black tea for weight loss)

ठळक मुद्दे एका विशिष्ट पद्धतीने चहा प्यायला तर त्याने शरीराला नुसता फायदाच होत नाही तर वजन कमी करण्यासाठीही खूप मदत होते, असंही काही आहारतज्ज्ञ सांगतात

चहा हा भारतातल्या बहुसंख्य लोकांचा जीव की प्राण.. कारण आपला दिवसच मुळात चहा पिऊन सुरू होतो. शिवाय प्रत्येक गोष्टीत चहा लागतोच.. मूड गेला तरी चहा हवा, मूड खूप छान असला तरी चहा हवाच.. आज काहीच चांगलं होत नाहीये म्हणून रिफ्रेश होण्यासाठी चहा हवा तसंच आज खूपच मस्त दिवस गेला म्हणून एक झक्कास चहा व्हायलाच हवा.. असं कोणतंही कारण आपल्याला चहा पिण्यासाठी पुरेसं असतं. आता चहामुळे ॲसिडीटी होते, अन्न पचत नाही असं अनेक जण म्हणतात. तसंच एका विशिष्ट पद्धतीने चहा प्यायला तर त्याने शरीराला नुसता फायदाच होत नाही तर वजन कमी करण्यासाठीही खूप मदत होते, असंही काही आहारतज्ज्ञ सांगतात (benefits of drinking black tea for weight loss). त्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने चहा प्यायला हवा, ते एकदा बघाच..(use of black tea for weight loss and fat burn)

 

चहा प्यायल्याने खरंच वजन कमी होतं?

एनडीटीव्ही फूड यांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपियन जर्नल ऑफ न्युट्रिशन यांनी नुकताच एक अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही ब्लॅक टी घेत असाल तर त्यामुळे नक्कीच तुमची पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.

कोणत्याही ड्रेसवर- साडीवर शोभून दिसतील असे मोत्याचे कानातले! बघताक्षणीच आवडणारे ८ सुंदर डिझाईन्स

याविषयी उंदरांवर प्रयोग करण्यात आले. त्यात असं आढळून आलं की वजन कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे ग्रीन टी उपयुक्त ठरतो, त्याचप्रमाणे ब्लॅक टी म्हणजेच दूध न घातलेला कोरा चहा देखील फायदेशीर ठरतो. ब्लॅक टी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया उत्तम होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण खूप कमी होते. 

 

ब्लॅक टी प्यायल्याने शरीरात खूपच कमी कॅलरी जातात. शिवाय त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स तसेच कोलेस्ट्रॉलही नसते. जर तुम्ही साखर न घालता ब्लॅक टी घेतला तर अधिकच उत्तम.

फक्त दिवाळीपुरतंच नाही; वर्षभर वापरा 'हे' घरगुती उटणं- पिगमेंटेशन, टॅनिंग कधीच होणार नाही

कारण भरपूर कॅलरी असणारे कोणतेही पेय घेण्यापेक्षा साखर, दूध असं काहीही नसलेला ब्लॅक टी घेणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. पण ब्लॅक टी घेण्याचे एवढे फायदे असले तरी तो प्रमाणातच घेतला पाहिजे. तो अतिप्रमाणात घेणे आरोग्यासाठी निश्चितच धोकादायक आहे.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स