Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Health tips: मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत महिलांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी (saffron water) कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 08:14 PM2022-02-28T20:14:39+5:302022-02-28T20:16:35+5:30

Health tips: मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत महिलांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी (saffron water) कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे. 

Benefits of drinking kesar/ saffron water, Helps women to reduce menstrual pain | Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Highlightsमहाग असेल तरी थोडंसं केशर नियमितपणे आपल्या पोटात जाणं गरजेचं असतं. केशरामध्ये व्हिटॅमिन A, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम यासारखे पौष्टिक घटक असतात.

आरोग्याच्या अनेक समस्यांवरचे उपाय आपल्या स्वयंपाक घरातच असतात. आपल्याला फक्त त्याचे उपयोग माहिती नसतात. केशर हा सगळ्यात श्रीमंत सुकामेवा म्हणून ओळखला जातो. कारण त्याची किंमतच एवढी जास्त असते की अगदी ग्रॅम किंवा तोळा या मापाने तो खरेदी केला जातो. महाग असेल तरी थोडंसं केशर नियमितपणे आपल्या पोटात जाणं गरजेचं असतं. कारण एवढंसं केशर (health benefits of kesar or saffron) खाल्ल्यानेही आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

 

काजू, बदाम, पिस्ता हा सुकामेवा येता जाता तोंडात टाकता येतो. नुसता खाता येतो. पण केशर तशा पद्धतीने खाल्ले जात नाही. त्यामुळे त्याचा वापर खूपच मर्यादित होतो. एखाद्या गोड पदार्थापुरताच त्याचा वापर हाेतो. त्यामुळे अगदी कधीतरीच केशर आपल्या पोटात जातं. म्हणूनच केशराचं पाणी हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय ठरतो केशराचं पाणी बनवणं आणि त्याचं सेवन करणं अतिशय सोपं आहे..

 

कसं बनवायचं केशराचं पाणी (how to make saffron water)
केशराचं पाणी बनविण्यासाठी एक कप भर पाणी घ्या आणि ते तापवायला ठेवा. या पाण्यात केशराच्या ३ ते ४ काड्या टाका. पाणी चांगले खळखळून उकळू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट असताना हे पाणी प्या.. केशरामध्ये व्हिटॅमिन A, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम यासारखे पौष्टिक घटक असतात. लाईकोपिन, अल्फा कॅटरीन, बीटा कॅरोटीन हे देखील केशरमध्ये असते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका तर कमी होतोच, शिवाय सौंदर्यासाठीही ते उपयुक्त ठरते.

 

केशर पाणी पिण्याचे फायदे (benefits of drinking saffron water)
१. केशरामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढलं असेल तर केशर पाणी नियमितपणे घेणं हा त्यावरचा उत्तम उपाय होऊ शकतो. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्याचं काम केशर करतं. 

२. मासिक पाळीतल्या पोटदुखीसाठी केशर पाणी पिणं हा एक उत्तम उपाय आहे. ज्या महिलांना पाळीच्या काळात खूप जास्त पोटदुखी, पायात गोळे येणं, कंबरदुखी असा त्रास होतो, अशा महिलांनी आठवड्यातून एकदा केशर पाणी जरूर प्यावं.

३. केशरमध्ये सेरोटिनन नावाचा घटक असतो. हा पदार्थ मानसिक ताणतणाव, नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी केशर पाणी पिण्याचा उपाय करून बघा. 

४. आजकाल विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच डोकेदुखीचा त्रास होतो. पण यामध्येही महिलांचं प्रमाण जरा जास्त आहे. आपल्या मैत्रिणी, नात्यातल्या महिला डोकेदुखी होत असल्याची तक्रार नेहमीच करतात किंवा आपण स्वत:ही त्याचा बऱ्याचदा अनुभव घेत असतो. त्यामुळेच डोकेदुखीचं दुखणं पळवून लावण्यासाठी केशर पाणी हा एक चांगला उपाय होऊ शकतो. 
 

Web Title: Benefits of drinking kesar/ saffron water, Helps women to reduce menstrual pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.