Lemon Juice With Warm Water : सकाळच्या काही सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात. याच कारणानं हेल्थ एक्सपर्ट हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करण्याचा सल्ला देतात. सकाळची सगळ्यात हेल्दी आणि सोपी सवय म्हणजे गरम पाणी पिणं. गरम पाण्यानं पचन तंत्र मजबूत होतं आणि शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. अशात यात जर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकाल तर याने अधिक जास्त फायदे मिळतात.
एक्सपर्टनुसार, सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. याने मेटाबॉलिज्म बूस्ट तर होतंच, सोबतच पचन तंत्र मजबूत ठेवण्यासही मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघत असल्यानं किडनी आणि लिव्हरचं कामही चांगलं होतं.
कोमट पाण्यात लिंबाचा टाकून प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत मिळते आणि बद्धकोष्ठतेची समस्या लगेच दूर होते. कोमट पाण्यानं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि मांसपेशींना आरामही मिळतो. अशात जाणून घेऊ की, सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास काय काय फायदे होतात.
सकाळी कोमट लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबाचा रस पिणं एनर्जी मिळवण्यासाठी आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी एक सोपा व हेल्दी उपाय आहे. यात व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतरही अनेक पोषक तत्व भरपूर असतात. याने इम्यूनिटी वाढते, फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो आणि शरीरात कोलेजनचं उत्पादन वाढवण्यास मदत मिळते. तसेच लिंबाच्या पाण्यानं पित्त उत्पादन वाढतं आणि पोट फुगण्याची समस्याही कमी होते.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास भूक कमी होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच यातील नॅचरल डिटॉक्सिफाइंग गुण लिव्हरमधील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. इतकंच नाही तर याने पचनक्रिया सुधारते.
इतरही फायदे
- कोमट पाण्यानं पचन तंत्र उत्तेजित होतं, तर लिंबाचा रस पित्त उत्पादन वाढवतं. ज्यामुळे पचन तंत्र मजबूत राहतं.
- लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड भरपूर असतं. जे लिव्हरमधून विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. अशात लिव्हरचं काम आणखी सुधारतं.
- कोमट पाण्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात आणि शरीर डिटॉक्स होतं.
- लिंबामध्ये पेक्टिन असतं आणि जेव्हा ते कोमट पाण्यासोबत पिता तेव्हा याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
- लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे फ्री रॅडिकल्ससोबत लढतात, तसेच त्वचेवरील डागही कमी करतात.
- लिंबातील व्हिटॅमिन सी मुळ इम्यून सिस्टीम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्हाला सर्दी-पडसा आणि इतर आजारांचा धोका कमी राहतो.
कसं तयार कराल लिंबू पाणी?
- एका भांड्यात थोडं पाणी गरम करा. ते एका ग्लासमध्ये टाका आणि त्यात अर्धा लिंबाचा रस टाका.
- टेस्ट वाढवण्यासाठी त्यात थोडं मध टाका. तसेच यात थोडी काळी मिरी पावडरही टाकू शकता.