Join us  

भाेगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरीच का खायची? काय त्याचे महत्त्व? वाचा ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 12:23 PM

Benefits of Eating Bajra Bhakari: संक्रांतीच्या (makar sankranti) आदल्या दिवशी (bhogi) तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते.. असं का, तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याचे नेमके फायदे तरी काय?

ठळक मुद्देएरवी सणावाराला आपल्याकडे भाकरी खाणं टाळतात. पण या संक्रांत सणाच्या पहिल्या दिवशी मात्र आवर्जून बाजरीची भाकरी केली जाते.

ज्वारीची भाकरी एरवी आपण वर्षभर खातो. पण हिवाळ्याचे २ ते ३ महिने मात्र आवर्जून बाजरीची भाकरी, बाजरीचा भात किंवा खिचडी खाण्यावर भर दिला जातो. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी तर बाजरीच्या भाकरीचा मान मोठाच असतो (Bajra bhakari on bhogi). एरवी सणावाराला आपल्याकडे भाकरी खाणं टाळतात. पण या संक्रांत सणाच्या (makar sankranti) पहिल्या दिवशी मात्र आवर्जून बाजरीची भाकरी केली जाते. आणि ती ही तीळ लावून. का खायची या दिवसांत बाजरीची भाकरी? का तिचे एवढे महत्त्व? (Benefits of eating Bajra bhakari on bhogi)

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनीही याविषयीची एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून तो ही अतिशय बोलका आहे. भोगीच्या दिवशी केली जाणारी मिश्र भाजी, चटणी, लोण्याचा गोळा, तोंडी लावायला कांदा आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी अशा पद्धतीने वाढलेल्या ताटाचा तो फोटो आहे. ही पोस्ट शेअर करताना ऋजुता म्हणतात की सगळ्या जगात प्रोटिन्स- कार्ब्स असा गदारोळ सुरू आहे. पण यात तुम्ही शांत रहा आणि भोगीची भाजी आणि भाकरी खा. कारण यातून ते सगळं मिळतं. सध्या वेटलॉस इंडस्ट्री जोरात वाढत आहे. पण त्यापेक्षा आपल्या पर्यावरणाशी मिळते- जुळते स्थानिक पदार्थ खाल्ले तर ते नक्कीच आरोग्यदायी ठरतात, असं त्यांना त्या पोस्टवरून सुचवायचं आहे.  

 

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे१. बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच भरपूर उर्जाही देते. तिळामधून कॅल्शियम, नॅचरल ऑईल मिळते. त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा होतो. 

तीळ -खव्याची वडी, जुही परमारने शेअर केली संक्रांत स्पेशल रेसिपी, वडीसाठी हव्या फक्त ३ गोष्टी

२. बाजरी हे एक लो कॅलरी डाएट मानले जाते. म्हणूनच हिवाळ्यात जर भुकही भागवायची असेल आणि वजनही वाढू द्यायचं नसेल तर बाजरीची भाकरी खा.

 

३. बाजरीच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोलेस्टरॉल नियंत्रणात राहिल्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तळपायाला मालिश करण्याचे ५ जबरदस्त फायदे! कधी- कशी मालिश करायची? बघा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला

४. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी बाजरी खाणे अतिशय फायदेशीर ठरते. 

५. बाळंतपणात झालेली शारिरीक हानी भरून येण्यासाठीही महिलांनी बाजरी खाणे उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नमकर संक्रांतीहेल्थ टिप्स