Join us  

थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 9:46 AM

Benefits of eating chapati with jaggery : जर चपातीबरोबर गूळ खाल्ला तर हे कॉम्बिनेशन शरीराल अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी आणि बॅक्टेरियांपासूनही बचाव करते.

गोड पदार्थांमध्ये घालण्यासाठी आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते. (Winter Health tips)  हिवाळ्याच्या दिवसात साखरेऐवी गुळ खाणं पसंत करतात.  बाजारात वेगवेगळ्या प्रकारेच गुळ मिळतात. गुळाची चव (Gul poli khanyache Fayde) त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. जर तुम्ही अस्सल गुळ म्हणजेच भेसळ नसलेला गूळ विकत घेण्याच्या विचारात असाल तर गावाच्या ठिकाणाहूनही मागवू शकता. (Benefits of eating chapati with jaggery)

गुळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. अनेकजण साखरेला पर्याय म्हणून गुळाचे सेवन करतात.चपातीबरोबर गुळ खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो याशिवाय गूळ एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. पचनक्रियादेखील चांगली राहते. (Benefits Of Eating Chapati With Jaggery)

१) जुन्या गुळाचा वापर करा

जर तुम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील  तर जुन्या गुळाचा वापर करा. कारण जूना गूळ नवीन गुळाच्या तुलनेत जास्तीत जास्त फायदे देतो. ज्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. जुन्या गुळाचा वापर आयुर्वेदात औषधी बनवण्यासाठी केला जातो. लिव्हर आणि स्लिप कंडिशन्ससाठीही फायदेशीर ठरतो. जुन्या गुळाची चव थोडी खारट असून रंग गडद असतो.  गुळ थोडा खारट लागत नसेल तर याचा अर्थ असा की गूळात भेसळ आहे.

फक्त ७ मिनिटांचा व्यायाम घरीच करा; जिमला न जाता सुटलेलं पोट होईल कमी, मेंंटेन राहाल

२) गुड खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते

हिवाळ्याच्या दिवसांत इम्यूनिटी वाढवण्यासाठी गुळाचे सेवन केले जाते. जर चपातीबरोबर गूळ खाल्ला तर हे कॉम्बिनेशन शरीराल अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी आणि बॅक्टेरियांपासूनही बचाव करते. यातील प्रोटीन, व्हिटामीन-६, थियामिन, व्हिटामीन ई सारखे पोषक तत्व प्रतिरोधक क्षमता वाढवतात. याशिवाय फ्लूपासूनही दूर ठेवतात. इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

३)पोटाचे त्रास कमी होतात

गुळात आयसोटीन आणि सोर्बिटोल, मॅन्गनीज, फॉलेट असे घटक असतात. ही तत्व गॅसचा त्रास दूर करतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. याशिवाय आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते.  रोज चपातीबरोबर गुळाचा लहानसा खडा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारेल.

४) हृदयाचे आरोग्य चांगले राहते

गुळात एंटी ऑक्सिडेंटसचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  नियमित गूळ खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स बॅक्टेरियांशी लढतात आणि हृदयाच्या विकारांपासून वाचवतात.

बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही

५) रक्त वाढण्यास मदत होते

गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. जर तुमच्या शरीरात रक्त कमी झालं असेल चपातीबरोबर  गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. याशिवाय अशक्तपणा, थकवा येणं अशी लक्षणंही जाणवत नाहीत. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स