Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुंठ आणि लवंग एकत्र करून खाण्याचे फायदे, ३ दुखण्यांवर उत्तम घरगुती इलाज!

सुंठ आणि लवंग एकत्र करून खाण्याचे फायदे, ३ दुखण्यांवर उत्तम घरगुती इलाज!

Health tips: सर्दी, खोकला झाल्यावर या दोन्ही गोष्टी आपण खातो. पण त्या एकत्रित खाल्ल्या तर त्याचा आणखी जास्त फायदा होतो (benefits of eating dry ginger and cloves)..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 03:54 PM2022-02-18T15:54:12+5:302022-02-18T15:55:04+5:30

Health tips: सर्दी, खोकला झाल्यावर या दोन्ही गोष्टी आपण खातो. पण त्या एकत्रित खाल्ल्या तर त्याचा आणखी जास्त फायदा होतो (benefits of eating dry ginger and cloves)..

Benefits of eating dry ginger and cloves together, best home remedy for many diseases | सुंठ आणि लवंग एकत्र करून खाण्याचे फायदे, ३ दुखण्यांवर उत्तम घरगुती इलाज!

सुंठ आणि लवंग एकत्र करून खाण्याचे फायदे, ३ दुखण्यांवर उत्तम घरगुती इलाज!

Highlightsलवंग आणि सुंठ या दोन्हींमध्ये ॲन्टी ऑक्सिडंट्स आणि ॲन्टी इन्फेमेटरी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. 

जर खूप खोकला यायला लागला किंवा मग सर्दी झाली तरच लवंग किंवा सुंठ खायचं एवढं आपल्याला माहिती असतं. पण सर्दी- खोकला या व्यतिरिक्तही अनेक आजारांवर लवंग आणि सुंठ प्रभावी ठरतात. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ते एकत्र करून खाता, तेव्हा त्याचा तब्येतीवर (health benefits of dry ginger and cloves) आणखी चांगला परिणाम दिसून येतो.

 

त्यामुळे सर्दी- खोकला किंवा शिंका याव्यतिरिक्त जर खालीलपैकी एखादी आरोग्याची तक्रार जाणवली तर लवंग आणि सुंठ एकत्र खाण्याचा उपाय करून बघा. पण कोणतंही दुखणं खूप वेळ अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

१. दातदुखी
लवंग आणि सुंठ या दोन्ही पदार्थांमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जर दात दुखत असेल, तर त्रास थांबविण्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी लवंग आणि सुंठ पावडर एकत्र करा आणि दाताखाली दाबून धरा. दुखणं लवकर थांबेल.

 

२. पचनाच्या तक्रारी (digestion)
जेवण झाल्यानंतर विडा खायचा, ही आपल्याकडची जुनी पद्धत. विड्यामध्ये सोप, सुपारी, कात, चुना असं सगळं टाकून झालं की विडा बंद करण्यासाठी त्याला आवर्जून लवंग लावली जाते. त्याचं कारण एवढंच की विड्यातल्या इतर पदार्थांप्रमाणेच लवंगही पचनासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी असा त्रास होत असेल तर लवंग खाणं फायद्याचं ठरतं. लवंगेप्रमाणेच सुंठदेखील पचनास मदत करणारी असते. त्यामुळे बडिशेप किंवा पुड सुपारीत थोडी लवंग आणि सुंठ पावडर टाकली आणि हे मिश्रण जेवणानंतर खाल्लं तर ते पचनासाठी अधिक फायदेशीर ठरेल. 

 

३. घसादुखी 
सर्दीची सुरूवात किंवा कसली ॲलर्जी किंवा तेलकट खाणं यामुळे घसा धरला असेल तरी लवंग आणि सुंठेचा काढा एकत्र करून घेणं फायदेशीर ठरतं. कारण लवंग आणि सुंठ या दोन्हींमध्ये ॲन्टी ऑक्सिडंट्स आणि ॲन्टी इन्फेमेटरी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. 

 

कशा पद्धतीने खावी लवंग आणि सुंठ
- लवंग आणि सुंठ एकत्र करून खाण्याचा पहिला पर्याय म्हणजे लवंग भाजून घ्या. त्याची पुड करा. त्यामध्ये थोडी सुंठ पावडर टाका. या दोन्ही पावडर एकत्र करून त्यात मध टाका आणि त्याचे चाटण घ्या.
- लवंगेचा चुरा आणि सुंठ पावडर दोन्ही अर्धा- अर्धा टिस्पून घ्या. एक कप पाण्यात हे दोन्ही उकळू द्या. पाणी उकळून अर्धे झाले की त्यात एक टीस्पून गुळ टाका आणि हा गरमागरम काढा प्या. 

 

Web Title: Benefits of eating dry ginger and cloves together, best home remedy for many diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.