Join us  

श्रावण शुक्रवारी का खायचे गूळ-फुटाणे? परंपरेतून मिळतील ५ फायदे, लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 9:15 PM

5 Benefits of Eating Jaggery And Roasted Chana: श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी- कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांना गूळ- फुटाणे देतात. वाचा गूळ-फुटाणे या पदार्थांचे शरीराला होणारे फायदे. (shravan special)

ठळक मुद्देआपल्या सगळ्या प्रथा आणि परंपरांच्या मागे शास्त्रीय कारण असतेच. तसेच कारण या गूळ- फुटाण्यांच्या मागेदेखील आहे.

श्रावण हा कसा आनंदाचा, उत्साहाचा महिना असतो. श्रावणातल्या मंगळागौरी, श्रावणातले शुक्रवार यानिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये श्रावणी शुक्रवारचा उत्साह दिसून येतो. प्रत्येक शुक्रवारी महिलांना हळदी- कुंकू कार्यक्रमाला बोलावले जाते आणि त्यांना गूळ फुटाणे (jaggery and roasted chana) खायला देतात. गूळ- फुटाण्यांचा यादिवशी विशेष मान असतो. आपल्या सगळ्या प्रथा आणि परंपरांच्या मागे शास्त्रीय कारण असतेच. तसेच कारण या गूळ- फुटाण्यांच्या मागेदेखील आहे. म्हणूनच आता जाणून घेऊया गूळ फुटाणे खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे लाभ.

 

गूळ फुटाणे खाण्याचे महत्त्वBenefits of eating jaggery and roasted chana१. गूळ आणि फुटाणे एकत्र करून खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते किंवा जे लोक ॲनिमिक आहेत, त्यांनी दरराेज थोडेसे फुटाणे आणि गूळ एकत्र करून खावे.

बाथरुममध्ये सतत कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, दुर्गंध गायब- बा‌थरुम कायम राहील सुगंधी- स्वच्छ

२. या महिन्यात पाऊस असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्दी- खोकला असा त्रास अनेक जणांना होतो. हा त्रास होऊ नये किंवा झालाच तर लवकर आटोक्यात यावा, यासाठी गूळ- फुटाणे खाणे फायदेशीर ठरते. 

 

३. फुटाण्यांमधून कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात.

माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

४. पावसाळी वातावरणात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे अनेक जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. अशावेळी थोडेसे फुटाणे खाणे फायदेशीर ठरते.

५. गूळ आणि फुटाणे एकत्र करून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सश्रावण स्पेशलहेल्थ टिप्स