Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा

रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा

Health tips:मखाणे अनेक पद्धतीने खाल्ले जातात. आता गूळ आणि तुपाचं बेस्ट कॉम्बिनेशन (Benefits of eating makhana) करून मखाणे खाऊन बघा.. आरोग्यासाठी ठरेल सुपरफूड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:39 PM2022-02-04T19:39:03+5:302022-02-04T19:39:45+5:30

Health tips:मखाणे अनेक पद्धतीने खाल्ले जातात. आता गूळ आणि तुपाचं बेस्ट कॉम्बिनेशन (Benefits of eating makhana) करून मखाणे खाऊन बघा.. आरोग्यासाठी ठरेल सुपरफूड...

Benefits of eating makhana with jaggery and ghee | रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा

रोज खा गूळ- तूप-मखाणे; ४ जबरदस्त फायदे, खाऊन तर पाहा

Highlightsमखाणे- गूळ- तूप एकत्र करून खा. नैसर्गिक पद्धतीने बाॅडी डिटॉक्स करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. 

मखाणा लाडू, मखाणा चाट, मखाणा भेळ अशा कित्येक पद्धतीने मखाणे खाल्ले जातात. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने खा, पण मखाणे अवश्य खा, असेही अनेक आहारतज्ज्ञ सांगत असतात. कारण मखाणे हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानला जातो. डायबेटिज आणि हृदयविकारासाठीही मखाणे अतिशय गुणकारी ठरतात. मखाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर  घटक असतात. मखाणे शरीरातीन बॅड कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात. त्यामुळे मखाणे (Benefits of eating makhana) आहारात असायलाच हवेत..

 

कसा करायचा हा पदार्थ?
मखाणे, गूळ अणि तूप एकत्र खाण्यासाठी सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप टाका. तूपात मखाने परतून घ्या. मखाने परतले गेले की त्यात गुळाची पावडर करून टाका. गुळ वितळेपर्यंत हे मिश्रण परतत रहा.. जेव्हा गूळ विरघळेल तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवून शकता. ४ ते ५ दिवस ते खराब होणार नाही. 

 

मखाणे आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे 
१. हाडांसाठी फायदेशीर (beneficial for bones)

थंडीमध्ये हाडांचं जुनं दुखणं उफाळून येत असतं. संधीवाताचा त्रासही या दिवसांत बळावतो. त्यामुळे मखाणे, गूळ आणि तूप एकत्र करून खाणं या दिवसांत फायदेशीर ठरतं. कारण या तिन्ही गोष्टींमध्ये कॅल्शियमचं उत्तम प्रमाण असतं. त्यामुळे या तीन गोष्टी जेव्हा एकत्र करून खाल्ल्या जातात, तेव्हा ते हाडांसाठी खरोखरंच सुपर फूड ठरतं.

 

२. वेटलॉससाठी उपयुक्त (weightloss)
मखाणे हे लो फॅट डाएट मानलं जातं. त्यामुळे वेटलॉससाठी जे प्रयत्न करत असतात, त्यांनाही मखाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. जर मखाणे गुळासोबत खाल्ले तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात असणारे लोह शरीरात उर्जा निर्माण करतात. त्यामुळे खूप अधिक वेळ इतर काही न खाताही उत्साही वाटू लागतं..  

 

३. त्वचेसाठीही उत्तम (best for skin)
हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्यामुळेख मखाणे, गूळ आणि तूप या दिवसांत खाल्ल्यास त्वचेसाठीही ते अतिशय फायद्याचं ठरतं. मखाण्यांमध्ये असलेलं अमिनो ॲसिड त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतं आणि त्वचेला नवी चमक देतं. तुपामुळेही त्वचा तुकतुकीत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत किंवा इतर वेळीही त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी मखाणे, गूळ, तूप हा पदार्थ खाऊन बघाच.. 

 

४. किडनी विकाराचा धोका कमी होतो (improves kidney functioning)
शरीरासाठी नकोशा असणाऱ्या घटकांचं शरीरातील प्रमाण वाढत जाणं आणि पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं यामुळे किडनी विकार बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळेच किडनी विकारांचा धोका उद्भवू नये, यासाठी मखाणे- गूळ- तूप एकत्र करून खा. नैसर्गिक पद्धतीने बाॅडी डिटॉक्स करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. 

 

Web Title: Benefits of eating makhana with jaggery and ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.