Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डाळिंब म्हणजे त्वचेसाठी मॅजिकल पाॅवर! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय डाळिंब खाण्याचे फायदे 

डाळिंब म्हणजे त्वचेसाठी मॅजिकल पाॅवर! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय डाळिंब खाण्याचे फायदे 

Healthy food for skin: त्वचेसाठी सुपर हेल्दी फूड शोधत असाल तर तुम्ही डाळिंब खाल्लंच पाहिजे... अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय ते डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 05:06 PM2022-01-18T17:06:01+5:302022-01-18T17:08:30+5:30

Healthy food for skin: त्वचेसाठी सुपर हेल्दी फूड शोधत असाल तर तुम्ही डाळिंब खाल्लंच पाहिजे... अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय ते डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benefits of eating pomegranates, It gives magical power to your skin, said actress Bhagyashree | डाळिंब म्हणजे त्वचेसाठी मॅजिकल पाॅवर! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय डाळिंब खाण्याचे फायदे 

डाळिंब म्हणजे त्वचेसाठी मॅजिकल पाॅवर! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय डाळिंब खाण्याचे फायदे 

Highlightsडाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही नियमितपणे डाळिंब खाल्ले पाहिजे.

बॉलीवूडमधलं एक मराठमोळं नाव म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री ( actress Bhagyashree)... कित्येक वर्षांपासून भाग्यश्री चित्रपटांमधून दिसलेली नाही. पण तरीही तिची लोकप्रियता जरादेखील कमी झालेली नाही. सध्या ती इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असते आणि तिचं फॅन फाॅलोईंगही जबरदस्त आहे. एवढंच नाही तर दर मंगळवारी तिच्या चाहत्यांसाठी ती काही हेल्थ टिप्ससुद्धा देत असते. #tuesdaytipswithb या सिरिजचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला असून खूपच कमी वेळात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणते की सध्या प्रत्येक जण बेरी खाण्याविषयी बोलतात, बेरी खाण्याचे फायदे समजावून सांगतात. पण बेरीपेक्षाही मी स्वत: डाळिंब खाण्याला प्राधान्य देते, कारण डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत, असं तिनं सांगितलं आहे. बाकीची फळं जशी चिरली की पटकन खाता येतात, किंवा धुतली की लगेच तोंडात टाकता येतात, तसं सुख डाळिंबाच्या बाबतीत मिळत नाही.

 

डाळिंब खायचं म्हटलं की ते सोलण्यासाठी तुमच्याकडे थोडा रिकामा वेळ हवा. शिवाय डाळिंब सोलत बसणं हे अनेक जणांना मोठंच कंटाळवाणं कामही वाटतं.. त्यामुळे डाळिंब न खाणारे अनेक जणं आहेत.. पण हा कंटाळा थोडासा बाजूला सारा आणि डाळिंब खा.. कारण डाळिंब खाणं हे आरोग्यासाठीच नाही, तर तुमचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठीही खूप गरजेचं आहे...

 

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले डाळिंब खाण्याचे फायदे
(Benefits of eating pomegranates)

- मेनोपॉजदरम्यान (menopause) खूप बायकांना वेगवेगळे त्रास होतात. यापैकी एक कॉमन त्रास म्हणजे खूप जास्त गर्मी होणे, रात्रीच्या वेळी दरदरून घाम येणे आणि घाबरल्यासारखे होणे.. हा त्रास कमी करण्यासाठी डाळिंब खाणं फायद्याचं ठरतं. भाग्यश्री सांगते की डाळिंबामध्ये असणारा phytoestrogens हा घटक मेनोपॉजदरम्यान होणारा अशा प्रकारचा त्रास कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.


- डाळिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेसाठी डाळिंब खाणं खूपच फायदेशीर आहे. ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचेवर अकाली वार्धक्याच्या खुणा दिसत नाहीत. त्वचा खूप अधिक काळ तरूण, टवटवीत राहते. 
- ॲण्टी ऑक्सिडंट्स (anti oxidants) भरपूर असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. त्यामुळे डाळिंब नियमितपणे खावे.
- डाळिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे पचनासाठीही डाळिंब खूप मदत करते. 
- शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे.

बॉडी पोश्चरच चुकतंय तर ३ आसनं करा, सांगतेय शिल्पा शेट्टी; योगा से ही होगा !


- रक्तातील इन्सुलिनची पातळी (insuline level) नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंबाचा उपयोग होतो.
- डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही नियमितपणे डाळिंब खाल्ले पाहिजे.
- डाळिंबामध्ये व्हिटॅमिन के देखील मोठ्या प्रमाणात असते. 

 

Web Title: Benefits of eating pomegranates, It gives magical power to your skin, said actress Bhagyashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.