Join us  

'हे' आहेत पावसाळ्यातले खरे इम्युनिटी बुस्टर, आजारपण टाळायचं तर रोजच्या जेवणात 'या' भाज्या खायलाच पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 12:51 PM

Real Immunity Boosters In Monsoon: नेमक्या या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण खायला विसरतो आणि भलत्याच अन्न पदार्थांच्या मागे लागतो. म्हणूनच तर पावसाळ्यात आजारपण वाढतं. 

ठळक मुद्देरानभाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची असावी. उडीद आणि ज्वारी यांचे पीठ एकत्रित करून बनविलेली कळण्याची भाकरीही रानभाज्यांसोबत खाणे खूप पौष्टिक असते.

पावसाळ्याच्या दिवसांत आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity) सुधारणं खरोखरंच गरजेचं असतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसांत वेगवेगळ्या माध्यमांतून संसर्ग (how to control viral infection in monsoon) होण्याचा धोका खूप जास्त वाढलेला असतो. सर्दी, खोकला, ताप यासारखी दुखणी तर असतातच. पण त्यासोबतच बाहेरच्या खाद्य पदार्थांमधून बॅक्टेरिया पोटात गेल्याने उलट्या, मळमळ, अपचन, डोकेदुखी असा त्रासही अनेकांना जाणवतो. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काही स्थानिक भाज्या (local fruits and vegetables that improves immunity) खाण्यावर विशेष भर दिला पाहिजे, असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी सांगितलं आहे.

 

त्यांनी याविषयीची एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही रानभाज्या दाखवल्या असून  पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या आवर्जून खायलाच पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

त्या म्हणतात की रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किंवा आरोग्याला लाभ व्हावेत म्हणून परदेशी भाज्या किंवा परदेशी फळं खाण्याऐवजी कधीही स्थानिक अन्नपदार्थांवर भर द्यायला पाहिजे. विशेषत: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तर पावसाळ्यात अशा स्थानिक भाज्या आणि फळं खाणं अतिशय गरजेचं आहे. हिरव्या रंगाच्या स्थानिक भाज्या आहारात घेतल्याने तब्येत सुधारण्यास मदत तर होतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि अपचनाचा त्रास होत असल्यास तो ही कमी होतो.  

 

पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे फायदे त्या- त्या प्रांतातल्या खनिजांनी समृद्ध असणे हे रानभाज्यांचे वैशिष्ट्य आहे. रानभाज्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे रानभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या खाल्ल्याने शरीर लवचिक बनते आणि त्यांच्यातील औषधी गुणांमुळे अनेक जुनाट आजारही बरे होतात.  

रानभाज्या खाताना या गोष्टी लक्षात ठेवा - रानभाज्या एकतर वाफवून खाव्यात किंवा मग भाजून खाव्यात.- रानभाज्या वाफवून घेत असाल तर त्याला तेल, मीठ, मसाला, लाल तिखट किंवा मग हिरव्या मिरचीचे वाटण चोळावे. यामुळे रानभाज्यांमधील पोषणमुल्येही कायम राहतात आणि त्या अधिक चवदार होतात.

पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या, यंदा खा-बघा ५ फायदे- पुदिना, लिंबू टाकून रानभाज्यांची पोषणमुल्ये वाढविता येतात.-  रानभाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची असावी. उडीद आणि ज्वारी यांचे पीठ एकत्रित करून बनविलेली कळण्याची भाकरीही रानभाज्यांसोबत खाणे खूप पौष्टिक असते.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.