गुढीपाडवा आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी गुढी उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी लागणारी काठी, दोरी, साडी, कलश असे साहित्य तर आपण पाहून ठेवतोच. पण त्यासोबतच तिची जी छोटीशी पुजा करतो त्याचीही तयारी करावीच लागते. या पुजेमध्ये कडुलिंबाचा पाला, आंब्याची पानं, विड्याची पानं, सुपारी, साखरेची गाठी असे साहित्य तर असतेच पण त्यासोबतच एक कैरीही असते. गुढीसमोर कैरी ठेवण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी दिसून येते (benefits of eating raw mango). काय असावं बरं यामागचं खरं कारण?(health benefits of raw mango or kairi) गुढीसमोर कैरी ठेवण्याला एवढं महत्त्व का? तेच आता पाहूया...(importance of raw mango or kairi on Gudhi Padva)
गुढीसमोर कैरी ठेवण्याला एवढं महत्त्व का?
आपल्या प्रत्येक सणावाराकडे आणि त्यादिवशी होणाऱ्या स्वयंपाकाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की आपले सणवार हे खाद्यसंस्कृतीला खूप महत्त्व देणारे आहेत.
गुढीपाडवा : शोभायात्रेला नटून जायचंय, पण पिंपल्सचं टेंशन? 'हा' घरगुती उपाय- टॅनिंग -पिंपल्स गायब
म्हणजेच जो सण ज्या ऋतूमध्ये येतो, त्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्यासाठी जे काही खाणं चांगलं असतं तेच सगळे पदार्थ त्या सणाच्या निमित्ताने घरी केले जातात.. तसंच काहीसं कैरीचंही आहे. कैरी आंबट असते म्हणून बरेच जण ती स्वत: खाणेही टाळतात आणि लहान मुलांना देणंही टाळतात. पण प्रत्येक फळामध्ये जसे काही औषधी गुणधर्म असतात तसेच ते कैरीमध्येही आहेत. ते गुणधर्म नेमके कोणते ते पाहूया..
कैरी खाण्याचे फायदे
१. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येऊन शरीरातले क्षार कमी होत जातात. ते संतुलित ठेवण्यासाठी कैरीमध्ये असणारे घटक उपयुक्त ठरतात.
लहान मुलांच्या हाताचे कोपरे खूपच काळवंडून जातात? २ सोपे उपाय- हात होतील स्वच्छ
२. उन्हाळ्यात बाहेर एवढी उष्णता वाढलेली असते की अगदी घरबसल्याही त्याच्या झळा लागतात. त्यामुळे अंगाची आग झाल्यासारखी होते. पोटात आग पडते. हा त्रास कमी करण्यासाठी उकडलेल्या कैरीचे पन्हे पिणं फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीराला गारवा मिळतो.
३. कच्ची कैरी मीठ लावून चावून खाल्ल्याने हिरड्यांचा त्रास कमी होतो.
४. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येत असल्याने लहान मुलांसकट मोठ्या माणसांनाही घामोळ्या येण्याचा त्रास होतो. घामोळ्या आल्यास कच्ची कैरी मिक्सरमधून फिरवून घ्यावी आणि तिचा लेप अंगाला लावावा. घामोळ्या लगेच कमी होतात.
गुढीपाडवा स्पेशल: पारंपरिक मराठी दागिन्यांची श्रीमंतीच न्यारी!! सांगा यापैकी तुमच्याकडे किती?
५. उन्हामुळे डिहायड्रेशन होऊन काही जणांना घसा सारखा कोरडा पडल्यासारखा वाटतो. त्यावर कच्ची कैरी मीठ लावून खाणे हा एक उत्तम उपाय आहे.