हिवाळा म्हणजे तब्येत कमाविण्याच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम ऋतू आहे, असं मानलं जातं. शिवाय या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्याची गरज असते. त्यामुळे महागडा सुकामेवा, तूप असे उष्ण- पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. आरोग्यासाठी सुकामेवा खाणं गरजेचं आहेच. पण तो खाताना मात्र घरात तुलनेने स्वस्त असणारे पण पौष्टिकतेच्या बाबतीत सुकामेव्याच्याच बरोबरीचे असणारे पदार्थ खायला आपण विसरून जातो. अशा पदार्थांपैकीच २ पदार्थ म्हणजे गूळ आणि फुटाणे (Benefits of eating roasted chana or futana with jaggery in winter). हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यातलं अतिशय उत्तम टॉनिक आहे.
गूळ- फुटाणे खाण्याचे फायदे१. फुटाणे हा प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो.
२. याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात फोलेट, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम असतात.
वयाच्या ६३ व्या वर्षी नीना गुप्ता करतेय जबरदस्त व्यायाम.. बघा व्हायरल व्हिडिओ
३. गुळामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं अतिशय लाभदायी ठरतं. लोह वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो.
४. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. फुटाण्यामध्ये कॅल्शियम असल्याने हिवाळ्यातली सांधेदुखी फुटाणे खाल्ल्याने कमी होऊ शकते.
५. गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
गाजर- मुळ्याचं चटपटीत लोणचं! तोंडाला सुटेल पाणी- जेवणात येईल रंगत, बघा चटकदार रेसिपी
६. फुटाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाचा त्रास कमी करण्यासाठी फुटाणे योग्य प्रमाणात खाणे फायद्याचे ठरते. शिवाय थंडीच्या दिवसांत अनेक जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही फुटाण्यांची मदत होते.
७. हिवाळ्यात सर्दी- खोकला असा त्रास अनेक जणांना होतो. यासाठी एखादा टेबलस्पून फुटाणे आणि अर्धा टेबलस्पून गूळ असे मिश्रण दिवसांतून दोन- तीन वेळा खावे. सर्दी- खोकल्याचा त्रास कमी होतो. मात्र गूळ- फुटाणे खाल्ल्यावर लगेचच पाणी पिऊ नये.