Join us

पेरू भाजून खा, वजन उतरेल भराभर! पाहा भाजलेला पेरु खाण्याचे फायदे आणि खास पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 18:24 IST

Benefits Of Eating Roasted Guava: पेरू तर आपण नेहमीच खातो. पण ज्यांना पेरूचे अधिक फायदे मिळवायचे असतील आणि वजनही कमी करायचं असेल त्यांनी भाजलेला पेरू एका विशिष्ट पद्धतीने खायला हवा..(health benefits of guava)

ठळक मुद्देपेरूमध्ये असलेल्या काही पौष्टिक घटकांमुळे हिवाळ्यामध्ये होणारे संसर्गजन्य आजार टाळता येतात.

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात पेरू आलेले असतात. पेरूला मीठ आणि लाल तिखट लावून खायचं हे आपल्याला माहिती आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी पेरूची भाजी, पेरूचं लोणचं, पेरूची जेलीदेखील केली जाते. या पद्धतीने आपण नेहमीच पेरू खातो (correct method of eating guava). पण पेरू भाजूनसुद्धा खातात आणि तशा पद्धतीने पेरू खाणं हे अधिक आरोग्यदायी असतं, हे मात्र अनेकांना माहिती नाही (health benefits of guava). बघा पेरू खाण्याची एक खास पद्धत आणि त्यामुळे आरोग्याला होणारे वेगवेगळे फायदे...(benefits of eating roasted guava)

 

पेरू भाजून का खावा?

आहारतज्ज्ञ अलका कर्णिक सांगतात की पेरू भाजून खाल्ल्यामुळे पेरूमधील सगळे पौष्टिक घटक आणि फायबर अन्नपचनासाठी अधिक उत्तम पद्धतीने मदत करतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी पेरू भाजून खाणे अधिक योग्य ठरते.

Wedding Season: कपड्यांनुसार दागिन्यांची निवड कशी करावी? ५ टिप्स- नेहमीच दिसाल स्मार्ट, आकर्षक

त्यासाठी रोज दुपारी जेवणामध्ये एक पेरू भाजून घ्या. त्यावर जिरे पावडर आणि थोडे सैंधव मीठ घ्या. यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक उत्तम होते. हृदयविकाराचा त्रास ज्यांना आहे, त्यांनी मात्र सैंधव मीठ घेणे टाळावे. पेरू भाजण्यासाठी गॅसवर पापड भाजण्यासाठी वापरतो ती जाळी ठेवावी. त्यानंतर भरीत करण्यासाठी ज्याप्रमाणे वांगे भाजताे, त्याप्रमाणे पेरू भाजावा. फक्त वांगे खूप जास्त भाजावे लागते, तेवढा जास्त पेरू भाजू नये. 

 

पेरू खाण्याचे फायदे

१. पेरूमध्ये असलेल्या काही पौष्टिक घटकांमुळे हिवाळ्यामध्ये होणारे संसर्गजन्य आजार टाळता येतात.

२. पेरूमधून संत्रीपेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पेरू खाणे अधिक फायदेशीर ठरते. 

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

३. पेरूमध्ये इन्सुलन प्रतिबंधक घटक असल्यामुळे मधुमेहींसाठी पेरू हे एक उत्तम फळ आहे. परंतू पेरू खाण्यापुर्वी रक्तातील साखर वाढलेली नाही ना, हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे. जर साखर वाढली असेल तर पेरू खाणे टाळावे.

 

टॅग्स :हिवाळ्यातला आहारवेट लॉस टिप्सफळेआरोग्यमधुमेहहृदयरोग