Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सातूचं पीठ फक्त उन्हाळ्यातच खावं असं काही नाही, पावसाळ्यातही खा- सातूच्या पिठाचे ५ फायदे

सातूचं पीठ फक्त उन्हाळ्यातच खावं असं काही नाही, पावसाळ्यातही खा- सातूच्या पिठाचे ५ फायदे

Why To Eat Satu Aata In Rainy Season: सातुचं पीठ हा पदार्थ थंड असतो म्हणून तो उन्हाळ्याच्या दिवसांतच खावा, असं अनेक जण सांगतात. पण खरं तर सातुचं पीठ पावसाळ्यातही खाणं अतिशय गरजेचं आहे. कारण....(satu aata is beneficial in monsoon also)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 08:10 AM2022-08-05T08:10:10+5:302022-08-05T08:15:01+5:30

Why To Eat Satu Aata In Rainy Season: सातुचं पीठ हा पदार्थ थंड असतो म्हणून तो उन्हाळ्याच्या दिवसांतच खावा, असं अनेक जण सांगतात. पण खरं तर सातुचं पीठ पावसाळ्यातही खाणं अतिशय गरजेचं आहे. कारण....(satu aata is beneficial in monsoon also)

Benefits of eating satu pith or satu aata, Eating satu aata in rainy season- 5 major health benefits | सातूचं पीठ फक्त उन्हाळ्यातच खावं असं काही नाही, पावसाळ्यातही खा- सातूच्या पिठाचे ५ फायदे

सातूचं पीठ फक्त उन्हाळ्यातच खावं असं काही नाही, पावसाळ्यातही खा- सातूच्या पिठाचे ५ फायदे

Highlights सातुचं पीठ हे थंड असतं. त्यामुळे ते उन्हाळ्यातचं खावं असं आपण याबाबत ऐकलेलं असतं. पण पावसाळ्यातही ते खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूपच गरजेचं आहे,

सातुचं पीठ (satucha pith- super food for monsoon) म्हणजे एक पौष्टिक पदार्थ. पुर्वी घरोघरी सातुचं पीठ केलं जायचं आणि उन्हाळ्यात तर हमखास हे पीठ दूध किंवा पाणी आणि गुळ घालून सकाळच्या न्याहारीत खाल्लं जायचं (how to make satu aata?). एकदा पीठ करून ठेवलं की ते कालवून खाणं हे अगदीच सोपं आणि झटपट होणारं काम. त्यामुळे संध्याकाळी थोडीशी भूक लागली तरी हा पदार्थ त्यासाठी अतिशय उत्तम. सातुचं पीठ हे थंड असतं. त्यामुळे ते उन्हाळ्यातचं खावं असं आपण याबाबत ऐकलेलं असतं. पण पावसाळ्यातही ते खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूपच गरजेचं आहे, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) सांगत आहेत. 

 

ऋजुता यांनी मान्सून सुपरफूड असा टॅग देऊन नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये सातुचं पीठ म्हणजे काय, ते कशापासून तयार करतात आणि पावसाळ्यात सातुचं पीठ खाणं गरजेचं का आहे, हे सांगितलं आहे. गहू आणि हरबरा डाळ आधी भिजत घातली जाते आणि नंतर हे दोन्ही सुकवले जातात आणि मग कढईमध्ये भाजून घेतले जातात. फ्लेवर येण्यासाठी त्यात वेलची पूड, सुंठ असे पदार्थही घातले जातात. काही भागांत गहू आणि हरबरा डाळीच्या बरोबरीनेच तांदूळही घातले जातात. म्हणूनच धान्यांचं मिश्रण असल्याने सातुचं पीठ अतिशय पौष्टिक मानलं जातं.

 

सातूचे पीठ खाण्याचे फायदे 
- सातुच्या पिठामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. 
- याशिवाय त्यातून लायसिन हे अमिनो ॲसिडदेखील पुरेशा प्रमाणात मिळतं.
- फॉलिक ॲसिड मिळविण्यासाठी सातुचे पीठ हे उत्तम स्त्रोत मानले जाते. 
- सातुच्या पीठातून प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ते थाेडंसं खाल्लं तरी त्यातून भरपूर उर्जा मिळते. 
- स्नायू बळकट करण्यासाठी सातुचे पीठ फायदेशीर ठरते.
- स्त्रियांच्या बाबतीत सातुचे पीठ नियमित खाल्ल्याने मासिक पाळीतल्या वेदना कमी होतात.
- सौंदर्याच्या दृष्टीनेही सातुचे पीठ खाणे महत्त्वाचे मानले जाते. कारण त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी तसेच केस गळती थांबविण्यासाठी मदत होते. 

 

पावसाळ्यात सातुचं पीठ खाणं विशेष गरजेचं का?
श्रावणात किंवा चार्तुमासात अनेक समाजात हिरव्या पालेभाज्या खात नाहीत. तसेच व्हिटॅमिन बी १२, फोलिक ॲसिड, अमिनो ॲसिड ज्या मांसाहारी पदार्थांमधून मिळतात, त्या पदार्थांचे सेवनही या काळात बंद केले जाते. त्यामुळेच या काळात शरीराला वरील पौष्टिक खनिजांची कमतरता भासू नये, म्हणून त्यासाठी सातुचे पीठ हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. त्याच्या सेवनानेही पुरेपूर पोषण मिळते. त्यामुळेच पावसाळ्यातही सातुचे पीठ आवर्जून खाल्ले पाहिजे, असा सल्ला ऋजुता दिवेकर देतात. 
 

Web Title: Benefits of eating satu pith or satu aata, Eating satu aata in rainy season- 5 major health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.