Join us  

उपवासाला साबुदाणा- बटाटा नको, रताळी खा, ५ फायदे- उपवास करुन खरंच व्हाल फिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 3:32 PM

7 Benefits of Eating Sweet Potato: उपवासाला बटाटा- साबुदाणा खाण्यापेक्षा रताळी खाल्ली तर ते तब्येतीसाठी अधिक चांगले असते. त्यामुळेच वाचा रताळे (shakarkandi, ratale) खाण्याचे ५ फायदे.

ठळक मुद्देउपवासाव्यतिरिक्त अन्य वेळीही रताळे खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे, असंही आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच बघूया रताळे खाण्याचे फायदे.

सध्या श्रावणामुळे (shravan) घरोघरी उपवास (fast) करणारी एक तरी व्यक्ती असतेच. कुणी श्रावणातले सोमवार करतं, कुणी शनिवार करतं. श्रावण आहे म्हणून एकभुक्त म्हणजेच एकदा जेवण आणि एकदा फराळाचे खाणे, असाही नियम अनेक जणांचा असतो. उपवासाला नेहमीच भगर, साबुदाणा, बटाटे असं खाण्यापेक्षा दिवसातून एकदा तरी रताळ्याचा पदार्थ खावा. यामुळे उपवासही होतो आणि तब्येतीचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. उपवासाव्यतिरिक्त अन्य वेळीही रताळे खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे, असंही आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच बघूया रताळे खाण्याचे फायदे.(7 Benefits of Eating Sweet Potato)

 

रताळे खाण्याचे फायदे१. मधुमेहींसाठीही फायदेशीरसेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितलेलं आहे की रताळे हे एक परफेक्ट फूड असून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहींनी रताळे उकडून खावेत.

श्रावण शुक्रवारी का खायचे गूळ-फुटाणे? परंपरेतून मिळतील ५ फायदे, लहान मुलांसाठीही पौष्टिक खाऊ!

२. रताळ्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोग यांचा धोका कमी करण्यासाठी रताळे खाणे फायदेशीर ठरते.  

 

३. अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. अशा महिलांनी नियमितपणे रताळे खायला पाहिजेत. 

४. रताळ्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना अपचन, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन असा त्रास होतो त्यांनी रताळे खावे.

पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश

५. वजन कमी करण्यासाठी जे उपवास करतात, त्यांनीही रताळी खायलाच पाहिजेत. कारण रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वेटलॉससाठी त्यांची मदत होते. 

 

६. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे डोळे, त्वचा चांगली राहण्यास फायदा होतो. तसेच रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि इतर खनिजेही चांगल्या प्रमाणात असतात.

"सासू नाही, माझी आईच...", सीमा देव यांची सून स्मिता सांगतेय, आई झालेल्या सासूचे जाणे... 

७. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही रताळ्यांची मदत होते. त्यामुळे जे लोक वारंवार आजारी पडतात, त्यांनी नियमितपणे काही प्रमाणात रताळी खावीत.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सश्रावण स्पेशलहेल्थ टिप्सआहार योजना