Join us  

अमेरिकन कॉर्न नव्हे, खा पांढरा देशी मका; त्याचे ५ जबरदस्त फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 6:27 PM

Benefits of Eating White Desi Corn: मधूमक्का किंवा बाजारात येणारा अमेरिकन कॉर्न नेहमीच खातो.. पण आपल्या देशातलं उत्पादन असलेला पांढरा देशी मक्का (White desi corn) खाण्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो.

ठळक मुद्देमधुमक्का किंवा अमेरिकन काॅर्न खाण्यापेक्षा आपल्या प्रांतात उगवणारा देशी मका खाणं आरोग्यासाठी कधीही अधिक फायदेशीर आहे.

पावसाळा सुरू झाला की मका बाजारात अगदी मुबलक प्रमाणात दिसू लागतो. थंडीची सुरुवात होईपर्यंत तो बाजारात असतो. पण बऱ्याचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पांढरा मका, पिवळा मका (corn or bhutta) असे मक्याचे अनेक प्रकार आहेत. पण बरेच जण हे दोन्ही प्रकारचे मका घ्यायचं टाळतात आणि अगदी कोवळे असणारे तसेच खाण्यास गोड लागणारे मधुमक्का किंवा स्वीट कॉर्न, अमेरिकन कॉर्न खरेदी करतात. पण आपल्या प्रदेशात उत्पादित होणारा पांढरा देशी मकाही अतिशय गुणकारी (Why to eat desi corn?) असतो, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) सांगतात.

 

ऋजुता दिवेकर यांनी नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. recipesofindia या त्यांच्या सत्रामध्ये त्या आपल्या प्रांतातील खाद्यपदार्थांबाबत माहिती देतात. तसेच हे पदार्थ खाण्याचे फायदेही समजावून सांगतात. त्यांच्या या सत्रात यावेळी त्यांनी देशी पांढरा मका खाण्याबाबत माहिती दिली आहे. मधुमक्का किंवा अमेरिकन काॅर्न खाण्यापेक्षा आपल्या प्रांतात उगवणारा देशी मका खाणं आरोग्यासाठी कधीही अधिक फायदेशीर आहे. हे कणीस भाजून खावे. खाताना त्याला मीठ आणि लिंबू लावल्यास त्याची चव तर आणखीन खुलतेच पण पोषकताही वाढते. त्याचा उपमा किंवा खिचडी खाणंही आरोग्यासाठी पोषक मानलं जातं. 

 

पांढरा मका खाण्याचे फायदे(Benefits of eating white makka)१. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत हाेते. दातांच्या बळकटीसाठी भाजलेलं मक्याचं कणीस दातांनी कोरून खाणं अधिक चांगलं मानलं जातं. 

२. पित्त आणि वात यांचा त्रास होत असल्यास मक्याचं कणिक खाणं फायदेशीर मानलं जातं. 

३. कोलेस्टरॉल कमी करण्यासाठीही मक्याचे कणीस खाण्याचा फायदा होतो.

४. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असते. 

५. मक्याच्या कणसामध्ये फॉलिक ॲसिडही भरपूर प्रमाणात असते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना