Join us  

वजन झटपट कमी करण्यासाठी नारळपाणी आहे खूप उपयोगी! पण कधी आणि कसं प्यावं? बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 9:05 AM

Benefits Of Having Coconut Water For Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी हा एक उपाय लगेचच करून पाहा...(how to drink coconut water for weight loss?)

ठळक मुद्देकाही अभ्यासांवरून असं लक्षात आलं आहे की नारळ पाण्यामध्ये असणारे घटक वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात

वजन काटा एकदा ठराविक आकडा ओलांडून पुढे गेला की मग तो पुन्हा मागे येण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. आपण प्रयत्न तर खूप करतो पण तरीही वजन काही कमी होत नाही, असा अनुभव अनेकांना येतो. तुम्हीही त्याच प्रयत्नात असाल तर मग एकदा हा नारळ पाण्याचा उपाय करून पाहा. काही अभ्यासांवरून असं लक्षात आलं आहे की नारळ पाण्यामध्ये असणारे घटक वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात (benefits of having coconut water for weight loss). शिवाय नारळपाणी पिण्याचे इतर अनेक आरोग्यदायी फायदेही आहेतच.(how to drink coconut water for weight loss?)

 

नारळपाणी पिऊन वजन कमी होते का?

१. कमी कॅलरी असणारे सगळेच पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. नारळपाण्यात खूपच कमी कॅलरी असतात. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी निश्चिचत उपयोगी आहे. 

पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..

२. युएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या अभ्यासानुसार नारळामध्ये आणि नारळ पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर नारळ पाणी प्या आणि त्यातलं खोबरंही खा. यामुळे पोट भरल्यासारखं वाटेल आणि त्यामुळे आपोआपच भूक कमी होईल. 

 

३. नारळ पाण्यामध्ये फायबर जास्त असल्याने ते पचनासाठीही अतिशय सोपं असतं. शिवाय पचनशक्ती अधिक चांगली होण्यासाठी ते मदत करतं.

बघा पावसाळी दमट हवेतील जंतू, बॅक्टेरिया घालविण्याचा सोपा उपाय, संसर्गजन्य आजारांचा धोकाही टळेल 

पचन चांगलं झालं की आपोआपच वजनाची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे रोज एक नारळपाणी प्यायल्यास अपचन, ब्लोटिंग, गॅसेस असे त्रास आपोआपच कमी होतील.  

४. नारळपाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. पाणी भरपूर प्रमाणात पोटात गेल्यामुळे आपोआपच भूकदेखील कमी लागते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहोम रेमेडी