Join us  

आंबट-गोड अननस खाण्याचे १० फायदे, अननस नेमके कधी-किती वाजता खावे? हिवाळ्यात खावे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 1:37 PM

Benefits of Pineapples according to Ayurveda : या फळातील गुणधर्म समजून घेऊन ते कोणत्या वेळेला खायला हवे याविषयी...

ठळक मुद्देआरोग्याच्या दैनंदिन तक्रारी दूर करण्यासाठी अननस अवश्य खायला हवे काटे असल्याने आणि चिरायला थोडे अवघड असल्याने आपण हे फळ खाणे टाळतो, पण...

उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहारात फळांचा समावेश आवश्यक असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे आपण नियमितपणे केळं, सफरचंद अशा फळं आवर्जून खातो. थंडीच्या दिवसांत बोरं, सिताफळ, पेरु, चिकू, संत्री ही फळंही आवडीने खातो. पण अननस आपण म्हणावे तितके खातोच असे नाही. एकतर या फळाला असणारे काटे आणि ते चिरायला थोडे अवघड असल्याने हे फळ फारसे आणले जात नाही. मात्र अननसात आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात आणि त्याचा शरीराला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे हे फळ आवर्जून खायला हवे (Benefits of Pineapples according to Ayurveda).

(Image : Google)

प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी नुकतीच याविषयी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी अननस आरोग्यासाठी काय चांगले असते आणि त्यामुळे आरोग्याच्या कोणत्या तक्रारी दूर होण्यास मदत होते याविषयी विस्ताराने माहिती दिली आहे. डॉ. दिक्षा आपल्या फॉलोअर्सना कायम काही ना काही माहिती देऊन आरोग्याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करत असतात. आताची पोस्टही त्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. अननसामध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी कॅन्सर गुणधर्म असल्याने या फळाचे आयुर्वेदात बरेच महत्त्व सांगितले आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने कोलेजन निर्मितीसाठी म्हणजेच त्वचा आणि केस चांगले राहण्यासाठी याचा उपयोग होतो.  

अननसातील गुणधर्म 

१. चव - गोड आणि आंबट 

२. गुण - पचायला थोडे जड तरी स्निग्ध 

३. पचचनानंतरचा प्रभाव - गोड 

४. प्रकृती - शीत 

५. उपयोग - वात आणि पित्त कमी करण्यास फायदेशीर 

कधी खावे ? 

स्नॅक टाईममध्ये म्हणजेच १० ते ११ च्या दरम्यान किंवा संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान हे फळ आपण खाऊ शकतो. 

कोणत्या तक्रारींसाठी फायदेशीर? 

१. किडनी स्टोन२. हृदयरोग३. रक्तदाब ४. जंत ५. पाळीच्या तक्रारी६. बद्धकोष्ठता७. कावीळ ८. हाडांच्या तक्रारी९. कोलेस्टेरॉल१०. जखम भरण्यासाठी 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाफळे