पोळ्या- भाकरी हे तर नेहमीचंच. बऱ्याचदा आपण पुऱ्याही करतो, पण त्याही गव्हाच्या पिठाच्याच असतात. म्हणून कधी आहारात बदल म्हणून तर कधी आरोग्यासाठी पोषक म्हणून बेसन पीठाचं धिरडं करून बघा. नाश्ता किंवा रात्रीचं जेवण म्हणून धिरडं ( Besan Roti), चटणी असा बेत आपण करू शकतो. बरेचदा वेटलॉस करण्यासाठी गहू टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यामुळे अशावेळी वेटलॉससाठी (food for weight loss) उपयुक्त ठरणारे धिरडे नक्कीच उपयुक्त ठरू शकते.
धिरडं खाण्याचे फायदे
१. प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत
जे लोक शाकाहारी असतात, त्यांच्या आहारात बऱ्याचदा प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. त्यामुळे प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी हरबरा डाळीचं धिरडं हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. हरबरा डाळीत प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. आठवड्यातून दोन वेळा हा पदार्थ खाल्ल्यास हरकत नाही.
२. वेटलॉससाठी उपयुक्त
धिरड्याच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात फायबर्स पोटात जातात.
आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण
फायबरचं आहारातलं प्रमाण योग्य असल्यास चयापचय आणि मेटाबॉलिझम या क्रिया व्यवस्थित होतात. आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साचण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ज्यांना वेटलॉस करायचं आहे, त्यांच्यासाठी धिरडं उत्तम ठरतं.
३. अशक्तपणा कमी होतो
हरबरा डाळीच्या पिठात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी धिरडं शक्तीवर्धक ठरतं. आजारातून उठलेल्या आणि शारिरीकदृष्ट्या थकून गेलेल्या व्यक्तीलाही धिरडं खायला देणं उर्जादायी ठरू शकतं.
मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर
४. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास उपयुक्त
बेसन पीठात व्हिटॅमिन बी चं प्रमाण अधिक चांगलं असतं. ते इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे जे लोक वारंवार आजारी पडतात, त्यांनी त्यांच्या आहारात हरबरा डाळीचं प्रमाण वाढवून बघावं.